ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

रस्ता दुभाजकाच्या शिवसनेच्या मागणीस यश...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/14/2021 7:56:18 AM


      माननीय महापालिका आयुक्त नितीनजी कापडणीस साहेब उपायुक्त राहुल रोकडे साहेब व वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख मॅडमजी व तत्कालीन भाजपचे सत्ताधारी व महापालिका प्रशासन यांचे आभार व अभिनंदन...

       यापूर्वीच शिवसेनेचे माजी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वारंवार तात्कालीन भाजप सत्ताधारी व माननीय आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब व वाहतूक पोलीस निरीक्षक प्रज्ञा देशमुख मॅडम यांच्याकडे निवेदनाने वारंवार पाठपुरावा करून संपूर्ण सांगली शहरांमध्ये रस्त्याच्या मध्यभागी कायमस्वरूपी R.C.C रस्ते दुभाजक बसवावेत व सांगली शहरात प्रमुख चौकात अत्याधुनिक सिग्नल बसवावेत यासंबंधात माजी पदाधिकारी जितेंद्र शहा,रावसाहेब घेवारे,अनिल शेटे,प्रभाकर कुरळपकर,प्रसाद रीसवडे, लक्ष्‍मण वडर, यांनी पाठपुरावा करत होते.सदरच्या पाठपुरावाच्या अनुषंगाने निवेदनाच्या अनुषंगाने महापालिकेने सर्व रस्त्यावरती रस्ते दुभाजक बसवण्याचे काम चालू केले आहे. पण अजूनही शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की संपूर्ण सांगली शहरात सर्व रस्त्यावर असे आरसीसी R.C.C रस्ते दुभाजक बसवावे अशी शिवसेनेची मागणी असून इथून पुढच्या काळात संपूर्ण सांगली शहरात असे रस्ते दुभाजक बसविल्यास अजिबात अपघात होणार नाहीत त्यामुळे संपूर्ण सांगली शहरात सर्व रस्त्यावर असे आरसीसी R.C.C रस्ते दुभाजक बसवावेत ही विनंती...

Share

Other News