ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

शेतकरी संघटनेच्या आजच्या देशव्यापी बंदला आम आदमी पार्टी, सांगलीचा सक्रीय पाठींबा व सहभाग..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/27/2021 5:45:05 PM


   केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या कायद्यांना आम आदमी पार्टीचा विरोध असून त्या विरोधात चाललेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आम्ही सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे या आंदोलनास एक वर्ष पूर्ण होऊन सुद्धा केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला नाही त्यामुळे भाजप सरकारकडून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कुटील प्रयत्न केले जात आहेत आत्तापर्यंत अनेक आंदोलन करते शेतकरी शहीद झाले असून सुद्धा केंद्र सरकार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने शेतकऱ्यांची वागत आहे.
केंद्र सरकारचा निषेध करून तिन्ही कायदे मागे घेण्यासाठी आम्ही, सर्व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी देशव्यापी बंद या बंदला सक्रिय पाठिंबा आम आदमी सांगली जिल्हा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सामील होऊन आपणास पाठिंबा देत आहोत.

राजकुमार राठोड    जिल्हाध्यक्ष.   अशपाक  शेख जिल्हा सचिव, वसीम मुल्ला पश्चिम महाराष्ट्र सचिव तोफिक हवालदार तसेच स्नेहल कुलकर्णी, शाहिद मुल्ला, जस्मीतसिंह भाटिया, नवाज खाटीक, मुनीर मुल्ला, उत्सव कवठेकर व शेतकरी संघटनेचे महेश खराडे आधी आंदोलन करते उपस्थित होते.

Share

Other News