ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगली जिल्हयात आता थैलेसिमिया रूग्णांना कायमस्वरूपी औषधे मिळणार, समवेदना फाऊंडेशनच्या अथक प्रयत्नाने सांगली सिव्हीलमध्ये औषधे उपलब्ध...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/26/2021 1:51:20 PM


    
    सांगली जिल्हयातील थैलेसिमिया रुग्णांना औषधे आता कायम स्वरूपी मिळणार आहेत.सांगली सिव्हीलमध्येही औषधेउपलब्ध करण्यात आली आहेत . समवेदना फाऊंडेशनच्या अथक प्रयत्नाना अखेर यश आले.
   
      २० ऑक्टोबर २०२१ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , मिरज व समवेदना मेडीकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांकरिता शासनामार्फत उपलब्ध झालेल्या चिलेटींग औषधांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे करण्यात आले. 
   रुग्णांना जन्मतः अनुवंशिक आजार असल्याने त्यांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असते. याकरिता बाधीत मुलानां दर महिन्याला आयुष्यभर रक्त चढवावे लागते. सतत रक्त चढवल्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते व शरीरातील विविध अवयवांवर दुष्परिणाम होतो.चिलेटींग औषधे दिल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते व दुष्परिणाम टाळण्यासाठी उपयोग होतो. परंतु ही औषधे महाग असल्याने व शासकीय रुग्णालयांमध्ये सातत्याने नियमितपणे उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना गैरसोय होत होती. गेल्या दोन वर्षातील कोविड साथीमुळे सांगली जिल्ह्यामधील रुग्णांना औषधे मिळविण्या साठी तारेवरची मोठी कसरत करावी लागली.
 गेल्या सहा वर्षा पासून समवेदना मेडीकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बर्कत पन्हाळकर आरोग्य प्रशासना बरोबर पाठपुरावा करीत होते ही औषधे लवकरात लवकर उपलब्ध व्हावी म्हणून शासन व  प्रशासनाच्या विभागातील वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार करून मागणी व पाठपुरावा करण्यात आले होते अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सिव्हील सर्जन.डॉ. संजय साळुंखे, मेडीकल सुपरिडेंट डॉ. शिशीर मिरगुंडे यांनी पत्राचे दखल घेवून पाठपुरावा करण्यास सुरवात केले. ही औषधे उपलब्ध होण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कार्यालयीन विभाग, राजेंद्र पाटील यड्रावकर,राज्य आरोग्य संचालक, सौ.अर्चना पाटील,सौ.तावडे मॅडम उपसंचालक महेंद्र केंद्रेसो यांनी पत्राचे दखल घेवून औषध पुरवठा करण्यामध्ये यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
   सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डेसीरोक्स' व 'केल्फर' ही दोन महत्त्वाची व महागडी औषधे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. लवकरच इतर औषधेही पुरवठा करण्यात येणार आहे तशी मागणीही पुढे पाठविण्यात आली आसून लवकरच उपलब्ध होणार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातील रुग्ण व पालकानां वणवण भटकावे लागणार नाही.
  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.
संजय साळुंखे यांनी थॅलेसेमिया आजाराविषयी व रुग्णांच्या गरजां विषयी  उपस्थितांना माहिती दिली व समवेदना मेडीकल फाउंडेशनने केलेल्या पाठपुराव्या बद्दल बर्कत पन्हाळकरांचे विशेष कौतुक केले. बालरोग विभागाचे प्रमुख व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे यांनी प्रशासनामार्फत औषधे उपलब्ध करून देण्याकरिता उच्च स्तरावर काय प्रयत्न केले याबाबत माहिती दिली व सर्व रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर यांनी थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांच्या असुविधा टाळण्याकरिता सर्व स्तरावर झालेल्या प्रयत्नांचे विशेष अभिनंदन केले व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मिळणाऱ्या सेवां विषयी समाधान व्यक्त केले तसेच इथून पुढेही थैलेसीमिया ग्रस्त रुग्णांना सहकार्य देण्याविषयी आश्वासित केले. योद्धा फौंडेशनचे अध्यक्ष सुभेदार आर एस पाटील व जनमतचे उपसंपादक सुरेश राटोड यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सांगली सिव्हील रुग्णालय व समवेदना मेडीकल फौंडेशनच्या अथक प्रयत्नाला यश आल्या बदल स्तुती केले. तर पन्हाळकर यांनी मुलांच्या दिव्यांग सर्टीफिकेट व डे केअर सेंटर सुरू करावे अशी विनंती आरोग्य प्रशासनास केले.
  समवेदना मेडीकल फाउंडेशन तरफे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर नणंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक व बालरोग तज्ञ डॉक्टर शिशिर मिरगुंडे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांना कोविड साथी  दरम्यान दिलेल्या असामान्य योगदानाबद्दल कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. 
   कार्यक्रमाचे संयोजन बालरोग विभागामार्फत करण्यात आले. या प्रसंगी उप वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे, बाल रोग तज्ञ डॉक्टर भावेश शहा, डॉक्टर हर्षल वाघ,डॉ विनायक मराळे, बाबासो लोखंडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर सृष्टी जाधव यांनी केले शासनामार्फत उपलब्ध केलेल्या औषधा बद्दल पालकांनी समवेदना मेडीकल फौंडेशन व मिरज सिव्हील हॉस्पिटलचे आभार व्यक्त केले. यावेळी रुग्ण व  पालक उपस्थित होते.


Share

Other News