सांगली दिनांक 18/10/2025
भिमनगर सांगली येथील झोपडपट्टी धारकांना दि.17/10/2025 रोजी झोपडपट्टी काढण्याचे नोटीस महापालिकेने दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्हा व झोपडपट्टी संघर्ष कृती समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर प्रचंड मोठ्या आंदोलन केले दिवसभर आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने सदरचे नोटिसेला तात्पुरते स्थगिती दिल्या आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाच्या सांगली शहर जिल्हाध्यक्ष तथा झोपडपट्टी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन झाले.
यावेळी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग शहरजिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे , विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे ,विद्याताई कांबळे, विनायक हेगडे, शिवसेनेचे ठाकरे गटाचे अनिल शेटे, तानाजी गडदे, डॉ शुभम जाधव ,भारत चौगुले ,नितीन माने ,राहुल हिरोडगी ,शिवाजी त्रिमुखे ,शितल खाडे ,अर्जुन कांबळे , फिरोज मुल्ला ,राहुल यमगर ,राजू कांबळे ,मनीषा कांबळे, चित्रा घोडके ,नितीन कांबळे, सचिन निंबाळकर , महादेवी सुतार , शालन कांबळे ,राकेश कांबळे ,उमेश जगताप शंकर हलगणे ,राजेंद्र कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते.