सांगली: आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याच्या वतीने महायुती सरकारच्या फसव्या पॅकेज विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेधात्मक काळी दिवाळी साजरी करण्यात आली
राज्यात अतिवृष्टीमुळे चौफेर नुकसान झाले आहे, कधी नव्हे असे नैसर्गिक संकट आल्यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णतः उध्वस्त झाला आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे भव्य मोर्चा काढून राज्यात सरसकट कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयाची मदत करण्याची मागणी सरकारकडे व्यक्त केली होती.
मात्र महायुती सरकारने घाईघाईत ३६ हजार ५०० कोटींची फसवी मदत जाहीर केली आहे. सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक करून ही फसवी मदत दिलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि आमच्या पक्षामार्फत मौन धारण करुन काळी दिवाळी साजरी करीत आहोत. शासनाने ही फसवी मदत करण्यापेक्षा तातडीने सरसकट कर्जमाफी करून, ओला दुष्काळ जाहीर करून,हेक्टरी ५० हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करावी.
या आमच्या भावना तातडीने वरिष्ठांकडे पाठवून समस्त शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली असल्याचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले सदर निवेदन हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार लीना खरात यांना देण्यात आले
जिल्हाध्यक्ष देवराज पाटील ,शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज , शेखर ,माने , वैभव शिंदे ,टी.व्ही.पाटील आनंदराव नलवडे ,सचिन जगदाळे, विवेक कोकरे ,हरीदास पाटील, हायुम सावनूरकर , विराज कोकणे ,विजय पाटील , मन्सूर खतीब ,हणमंतराव देशमुख ,विश्वासराव पाटील ,आनंदराव पाटील, संजय रानमाळे पाटील ,अभिजीत हारगे ,विनायक केरीपाळे ,आयुब बारगीर ,राजू पाटील , तानाजी गडदे, चंद्रकात माने ,डॉ शुभम जाधव, संदिप व्हनमाने, अभिजीत कोळी, अर्जुन कांबळे ,संजय सरवदे, गजानन पाटील ,प्रसाद मदभाविकार , अरुण चव्हाण, बाहुबली पाटील, शितल खाडे, प्रकाश सूर्यवंशी, आदित्य नाईक ,प्रणवी पाटील, भारत चौगुले ,राहुल यमगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.