स्ट्रीट लिटर पिकर आणि वॉटर रिसायकलिंगसह हाय कॅपॅसिटी जेटिंग मशीनचा समावेश; आयुक्तांनी पाहिले प्रात्यक्षिक
सांगली: सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात शहर स्वच्छता अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी आज ६ नवीन अत्याधुनिक मशीनरी दाखल होणार.
महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी या अत्याधुनिक मशीनचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर त्या लवकरच मनपाच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश दिले.
👉 प्राप्त नवीन अत्याधुनिक मशीनरी:
1. ५ नग व्हेईकल माउंटेड गारबेज सक्शन मशीन (लिटर पिकर): (महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी उत्थान योजनेतून मंजूर).
2. १ नग हाय कॅपॅसिटी सक्शन अँड जेटिंग मशीन (वॉटर रिसायकलिंग सुविधेसह): (नगरपरिषद प्रशासन संचनालय यांच्यामार्फत उपलब्ध).
👉 स्वच्छतेत होणार मोठे बदल:
या अत्याधुनिक मशिनरीमुळे शहरातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे:
• लिटर पिकरमुळे: शहरातील आठवडा बाजार, रस्त्याच्या बाजूला पडणारा कचरा (street litter) आणि 'जीव्ही पॉईंट्स' (Garbage Vulnerable Points) स्वच्छ ठेवले जातील.
• जेटिंग मशीनमुळे: मलवाहिन्या आणि भूमिगत गटारांची स्वच्छता अधिक सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने होईल. या मशीनला वॉटर रिसायकलिंग सुविधा असल्याने पाण्याची बचतही होणार आहे.
महापालिका आयुक्त श्री. सत्यम गांधी यांनी यावेळी संबंधितांना मशिनरीचा योग्य आणि प्रभावी वापर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राहुल रोकडे, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता श्री. चिदानंद कुरणे, श्री. विनायक जाधव, सहायक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी श्री. याकूब मद्रासी, स्वच्छता निरीक्षक आणि संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.