ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्यावतीने हरीत गृह (पॉली हाउस)*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/30/2021 7:47:50 PM

गडचिरोली, (जिमाका) दि.30 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्यावतीने आदिवासी महिला विकास होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गरज लक्षात घेऊन अनुसूचित जमातीच्या  1 महिला बचत गटाकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मार्गदर्शक सुचनेप्रमाणे हरीत गृह (पॉली हाउस) उभारणी करणे नियोजित आहे. तरी गडचिरोली, कुरखेडा, कोरची, आरमोरी, वडसा, धानोरा, चामोर्शी या तालुक्यातील इच्छुक अनु.जमातीच्या महिला बचत गटांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे 1) महिला शेतकरी बचत गटांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 2) ग्रामसभेचा ठराव. 3) जमिन धारणेचा 7/12 चा दाखला, 8- अ चा उतारा व नकाशा 4) आधार कार्डची प्रत 5) बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत. ही कागदपत्रे सात दिवसाच्या आत प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली सोनापूर, गडचिरोली या कार्यालयात सादर करावे असे प्रकल्प संचालक, आत्मा गडचिरोली यांनी कळविले आहे.

Share

Other News