शिक्षणप्रकियेत सेवानिवृत्त शिक्षकांना संधी न देता बेरोजगार तरुणांना संधी देण्याची, संभाजी ब्रिगेडची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/06/2025 9:13 AM

प्रति,
मा जिल्हाधिकारीसौ,
सांगली.
 प्रत.. 
मा.ना.दादाजी भुसे साहेब,
शालेय शिक्षण मंत्री, 
महाराष्ट्र राज्य मुंबई. 
      
     *विषय* - सेवानिवृत्त शिक्षक यांना मानधनावर शिक्षण प्रक्रियेत नेमणूक न देता बेरोजगार तरुणांना संधी देण्याबाबत 

   *संदर्भ*- १)मा उपसचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील पत्र क्रमांक पत्र  संकीर्ण २०२३ प्र क 362 / टी एन टी- दिनांक सात जुलै २०२३
 २)सामान्य प्रशासन विभाग / वशी /१०६७८/०२४ प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली दिनांक 16/ 8 /2024
 
महोदय, 
    उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास विनंती की आज स्थानिक परिसरात डीएड,बीएड पदविधर व पदविधारक सुशिक्षित बेरोजगार युवक युवती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.शासनाने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना यामध्ये सामावून घेत त्यांच्या नेमणुकी करत बेरोजगारांचा प्रश्न सोडविणे जास्त महत्वाचे आहे.पेन्शन धारकांना ही नेमणूक देणे योग्य नाही.   
    जिल्हा परिषद शाळा, मनपा शाळा, नगर पालिका शाळा, या शाळांमध्ये सेवा निवृत्त शिक्षक भरती करून ग्रामीण भागातील शिकलेल्या मुलांच्या पिढीचे  जाणीवपूर्वक नुकसान करीत आहात का? असा प्रश्न निर्माण होतो. अनेक तरुण बेरोजगार होऊन आत्महत्या करत आहेत. शासन प्राथमिक खाजगी शाळा, माध्यमिक खाजगी शाळा अनुदानित शाळामधून सेवानिवृत्त शिक्षक यांची मानधना वर नेमणूक करीत नाही. मग हा दुजा भाव नेमका कशासाठी ? फक्त ग्रामीण भागातील सरकारी शाळा मधूनच नेमणूक करण्याचा आदेश का? असे प्रश्न निर्माण होत आहेत.  यामुळे ग्रामीण भागात असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. याचा शिक्षणावर परिणाम होत आहे.
डी एड, बी एड झालेले सुशिक्षित  बेकार तरुण खूप आहेत.त्यांना तसेच बेकार ठेवून, पेन्शन धारक यांना नेमून तरुणांचे खच्चीकरण करण्यासारखे आहे.म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कोणत्या ही शाळेवर सेवानिवृत्त शिक्षक यांना मानधनावर नेमणूक देऊ नये. 
  सेवानिवृत्ती नंतर शिकवण्याची मानसिकता कमी होते असे मानसशास्त्र सांगते,मग लहान मुलांना हे लोकं काय देणार ?   
फक्त मुलांना सांभाळण्याचे काम करतील का ?                                   त्यामुळे भविष्यात अशा कोणत्याच नियुक्त्या होणार नाही असा कायदा करावा. सेवानिवृत्त शिक्षकांची इच्छा असेल निवृत्तीनंतर काम करायची तर शासनाने त्यांना जातीय जनगणना, मतदान प्रक्रिया व शाळाबाह्य कामे यामध्ये सक्रिय करून घ्यावे. त्यामुळे शिक्षकावरही या कामांचा बोजा पडणार नाही व चांगले शिक्षण ग्रामीण स्तरावर सुद्धा उपलब्ध होईल.
      यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे, रामहरी ठोंबरे, जालिंदर पारणे, प्रकाश पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या