** १७ व्या शतकातील ऐतिहासिक तलवार कवठेएकंद , सांगली येथील सिद्धनाथ मंदिरात...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/12/2021 10:55 AM



       ही तलवार १७ व्या शतकातील असून अजूनही तलवारीला त्यावेळची धार आहे, अजूनही तलवारीची धार जराही गेली नाही. ही तलवार आहे पेशव्यांच्या स्वामिनिष्ठ सरदार असणाऱ्या व तासगाव व जमखंडी संस्थानचे अधिपती कै. श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांची....
      श्रीरंगपट्टणमच्या युद्धात व इंग्रज सेनापती गॉइर्ड याच्याविरुद्ध झालेल्या युद्धात भाऊंनी ही तलवार वापरली होती

*पण ही तलवार कवठेएकंद मध्ये कशी ?*

     हेमाडपंथी बांधकाम असणारे कवठेएकंद येथील प्रसिद्ध सिद्धराज मंदिर हे पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. याच कवठेएकंद गावातील दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात येणारे शोभेचे दारूकाम अख्या भारतात प्रसिद्ध आहे, पंचक्रोशीतील भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या या मंदिरात नेहमीच श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांची देवदर्शनासाठी भेट असायची. अशातच एकदा परशुरामभाऊ एक मोहीम फत्ते करून मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले असता भाऊंच्या कमरेवर नेहमीच बांधलेली परशुरामभाऊंची आवडती तलवार आपोआप मंदिराच्या गाभाऱ्यात निघून पडली. त्यानंतर भाऊंनी देवस्थानला भेट म्हणून ती तलवार तिथेच ठेवली. कालांतराने कवठेएकंद हे गाव पटवर्धन संस्थान वाटणीत बुधगांवकर पटवर्धन सरकरांकडे आले पण, ती तलवार 300 वर्षानंतर अजूनही मंदिरात सुस्थितीत आहे. अंदाजे, सव्वाचार फूट उंची व 12 ते 15 किलो तलवारीचे वजन असून तलवार पुर्णतः पंचधातूंनी बनलेली आहे, तलवारीवर सुंदर असे नक्षीकाम आहे. 
         आज मला त्या ऐतिहासिक तलवारीला स्पर्श करण्याचा योग आला आजही ही तलवार कवठेएकंदकरांनी व देवस्थान प्रशासनाने व्यवस्थित जपून ठेवली आहे. एकदा सर्वांनी ही तलवार अवश्य पहावी.

©प्रशांत मुळीक, बुधगांव
     8208742970

Share

Other News

ताज्या बातम्या