सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन व सार्वजनिक शौचालयांची कामे पूर्ण करा - उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/12/2025 5:43 PM

नांदेड - सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच सार्वजनिक शौचालयांची कामे येत्या 10 जानेवारी पूर्वी पूर्ण करून त्यासाठीचा उपलब्ध निधी पूर्णतः खर्च करण्यात यावा, असे निर्देश जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी दिले.
     नायगाव पंचायत समिती सभागृहात आज ग्रामपंचायत अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस गट विकास अधिकारी पी. टी. वैष्णव, विस्तार अधिकारी पी. एस. जाधव, गणेश टोनगे, स्वच्छता तज्ञ विशाल कदम, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, माहिती-शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल लोकडे तसेच गट समन्वयक दत्ता इंदूरकर उपस्थित होते.
      उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी यावेळी नायगाव तालुक्यात सुरू असलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ज्या कुटुंबांकडे अद्याप शौचालयांची सुविधा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांना प्राधान्याने शौचालय उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
      नायगाव तालुक्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची 25 गावांमधील कामे अद्याप अपूर्ण आहेत. यासोबतच सार्वजनिक शौचालयांची 15 कामे प्रलंबित कामे पूर्ण करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले. गावांमध्ये शंभर टक्के शौचालय वापर, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सेग्रीगेशन शेड, घनकचरा प्रक्रिया आदी स्वच्छताविषयक सर्व कामे पूर्ण करून गावे अधिक सक्षमपणे हागणदारीमुक्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व निकष पूर्ण करून 10 जानेवारी पर्यंत गावे हागणदारीमुक्त अधिक घोषित होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही उपमुख्य कार्यकारी अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी यावेळी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या