महासार्कच्या सदस्यपदी स्वारातीमचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 30/12/2025 5:45 PM

नांदेड :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींची राज्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र
शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) च्या सदस्यपदी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे.
महासार्कची स्थापना उच्च शिक्षण, संशोधन व उपक्रम क्षेत्रातील उत्कृष्टता अधिक बळकट करण्यासाठी करण्यात आली असून ज्ञाननिर्मिती, जतन व प्रसार, अध्यापन-संशोधन, कौशल्य विकास, प्रशिक्षण, शिक्षण व विस्तार कार्याद्वारे समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणे हे परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. परिषदेमध्ये शासनाद्वारे दोन प्र-कुलगुरूंची सदस्य म्हणून नामनिर्देशित नियुक्ती करण्यात येते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या नियुक्तीबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, डॉ. डी. एम. खंदारे, डॉ. पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी पराग भालचंद्र, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, आयक्यूएसीचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या तरतुदींनुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये विविध शिक्षण पद्धती, संशोधन व नवोपक्रम, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सहकार्य व अभ्यासक्रमांमध्ये शैक्षणिक समता निर्माण करणे, राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत विविध स्तरांवर क्रेडिट ट्रान्सफर यंत्रणेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे तसेच विद्यापीठांमध्ये सहकार्य व समन्वयाची संस्कृती विकसित करण्यासाठी महासार्क प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या