पेंढरी प्रतिनिधी:-प्रशांत पेदापल्लीवार
धानोरा तालुक्यात धान कटाई होवून महीना उलटला पण शासनाने आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न केल्याने बळी राजा चिंताग्रस्त आसुन तालुक्यातिल सर्वच शेतकरी धान केंद्राची आतुरतेने वाट पहात आहेत.आधारभुत किमतीने खरेदी विक्री सोसायटी अंतर्गत धान खरेदी केले जाते.माञ यावर्षि पावसा अभावा धान भरलेच नाही आणि हलक्या प्रतिच्या धान्याची कापनि सोबतच मळनी आक्टोबंर महीन्यात आटोपलि त्यामुळे धान्य साठवून ठेवायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.तसेच मध्यम प्रतिचे आणि जड प्रतिच्या धान्याची कापनी आटोपुण मळनी झालेली आहे.शेतकरी अळीअडचणीवर मात करन्याकरिता तसेच सावकारी कर्ज आणी मुलाबाळाचे शिक्षण ,लग्ण समारंभा करिता शेतकरी आधारभुत धान खरेदी केंद्रा अभावि अतिशय कमि किमतित व्यापाऱ्याला विकत आहे.शेतकऱ्यांची होनारि पिळवणूक थांबविन्या करिता तालुक्यातिल आधारभुत धान खरेदि लवकरात लवकर सुरु करन्याचि मागणी धानोरा तालुक्यातिल शेतकऱ्यानी केलि आहे. संपुर्ण तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान्य पिकाचे उत्पन्न घेतले जाते.पाण्याच्या साधना अभावी .मात्र यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना हुलकावणी दिल्याने ,शेतकऱ्यांच्ये रोप,पळे रोवणी पुर्वीच कळपले.अनेकांना दुबार पेरणी करावि लागली .त्यानंतर ही नियमित पाणि न पडल्याने निसर्गाच्या लहरीपणावर आधारलेलि शेतिला किडीच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागला.यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठीच घट उदभवत आहे.पाण्याअभावी शेकडो बळीराज्याचे धानपिक करपले .त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच धान कापणी करावी लागली .दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक समस्या दुरकरन्या करिता बळी राजाने कापणी व मळनी सुरु केली .त्यामुळे धान्य साठविने शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे.आधारभुत धान खरेदी केंद्र सुरु न झाल्याने धान विकायचे कुठे हाच मोठा प्रश्न बळीराजा पुढे आवासुन उभा आहे.अशाच परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वताचे धान्य अतिशय कमि किमतीत व्यापाऱ्यांना विकायची वेळ आलीआहे.माञ तिन महिन्या पुर्वि 7/12आँनलाईन करुण उपयोग काय ?असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. गावागावात असलेले खाजगी व्यापारी बळीराजाचे धान्य अतिशय कवडिमोल भावात घेत आहेत .यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होतांना दिसते.धान्याची खरेदी करन्या करिता खरेदी केंद्रावर सातबारे सप्टेंबर महीन्यापासुन आँनलाईनची कामे सुरु असुनही दिवाळी उलटली पण धान खरेदी केंद्र सुरु झालेलि नाहीत.सध्यातरी बळीराजावर तिहेरी संकट उभे ठाकल्याचे दिसुन येते.पाण्याअभावि धान्य करपले,उभे असलेले धान्य किडिने फस्त केले आणि हाति आलेले धान्य सरकार घेन्याच्या कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही .जगाचा पोशिदां समजला जानारा बळीराजाच भरडल्या जात आहे. त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलून धानोरा तालुक्यातिल आधारभुत धान खरेदीकेंद्र लवकरात लवकर सुरु करन्यात यावे अशी मागणी तालुक्यातिल शेतकऱ्यांनी केली आहे.