नांदेड :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेत दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचे आणि विचारांचे स्मरण केले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया रचला. सहकार, शिक्षण, कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांत त्यांनी घेतलेले निर्णय आजही राज्यासाठी मार्गदर्शक आहेत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेले 'बेरजेचे राजकारण' ही त्यांची मोठी ओळख आहे.
याप्रसंगी नगसेवक प्रतिनिधी किशोर भवरे,उपआयुक्त नितिन गाढवे,उपआयुक्त स.अजितपालसिंग संधु,मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग,सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक,सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्यासह मनपातील इतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.