आरमोरी : आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी आरमोरी नगर परिषदेचा अभियंता प्रदिप मेश्राम (30) याच्याविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई आज 1 डिसेेंबर रोजी करण्यात आली.
तक्रारदाराच्या वडीलाच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलाचा निधी त्याच्या खात्यावर जमा करण्यासाठीचा मोबदला म्हणून अभियंता प्रदिप देवराव मेश्राम याने 10 हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती 8 हजारांची लाच स्वीकारतांना गडचिरोली एसीबीने मेश्राम याच्यावर कारवाई केली आहे.
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, पोलिस हवालदार नथ्थ्यु धोेटे, नापोशि राजेश पदमगिरीवार, स्वप्नील बांबोळे, किशोर जौंजाळकर, पोशि श्रिनिवास संगोजी, किशोर ठाकूर, संदिप घोरमोडे, संदिप उडाण, मपोशि ज्योत्सना वसाके, चालक शिपाई तुळशिराम नवघरे यांनी केली आहे.