मा. नगरसेवक अभिजित भोसले यांच्याकडून वार्ड १८ ड साठी उमेदवारी अर्ज दाखल

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/12/2025 1:14 PM

सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ 

आज वॉर्ड क्र. 18 गट ‘ ड ‘ साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत नामनिर्देशन पत्र दाखल केले.
हा अर्ज भरण्याचा क्षण माझ्या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी, प्रत्येक नागरिकाशी केलेल्या सेवेच्या आणि विकासाच्या वचनबद्धतेची ठाम सुरुवात आहे. आतापर्यंत आपण दिलेला विश्वास, प्रेम आणि पाठबळ हेच माझे खरे बळ ठरले आहे.

  2018 पासून आपण माझं काम पाहिलंय मी मनापासून सेवा देण्यासाठी वचनबद्ध राहून काम केलेय.,लोकहिताची भूमिका घेतली आहे. दोन्हीही वेळेस कोरोना, महापूर, प्रभागाचा पायाभूत विकास म्हणजेच रस्ते गटार, ड्रेनेज, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याची दोन उपकेंद्र, नाटयगृह, भाजीमंडई,अग्निशमन केंद्र, उद्यान, वाचनालय अभ्यासिका,स्केटिंग ट्रॅक, सांडपाणी निचऱ्यासाठी 260 कोटींचा मंजूर प्रकल्प, अंकली नाला खुला करणे, यासोबतच वैयक्तिक अडीअडचणी असोत किंवा प्रभागातील सार्वजनिक समस्या मध्ये हाक मारली की उपलब्ध राहून प्रश्न सोडवायला अग्रेसर राहायच्या निर्धाराने काम करत राहिलो, या दरम्यान समस्या आणि त्याचे उत्तर त्यातून लोकांना दिलासा प्रभागाचा विकास आणि अडचणीच्या आपत्तीच्या काळात लोक हेच माझे सांगाती समजून कार्यरत राहिलो. .यामध्ये माझे सहकारी माझे सांगाती माझे कुटुंब म्हणून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आपण सर्वांनीच माझ्या कामाबाबत व्यक्त होताना येणाऱ्या निवडणुकीत माझ्यासाठी आपण असालच ही खात्री घेऊन आपल्या प्रतिसादासाठी वाट पाहतोय

आपण दिलेला विश्वास हीच माझी प्रेरणा आहे आणि तोच विश्वास पुढेही सार्थ ठरवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या निवडणुकीत निश्चितच विजय मिळवेल आणि शहराच्या विकासासाठी लोकाभिमुख, संवेदनशील आणि स्थिर सत्ता प्रस्थापित होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

आपल्या सर्वांच्या साथीतून प्रभागाचा विकास आणि शहराचा सन्मान अधिक उंचावूया.
आपला विश्वास, माझी जबाबदारी.तुमच्या या अभिजीत ला पाठिंबा द्या. घड्याळ चिन्हासमोर मतदान करून माझ्यासोबतच
सचिन रमाकांत सावंत  18 अ ⏰
नसीमा गैबीसो नाईक  18 ब ⏰
स्नेहल सचिन सावंत  18 क ⏰
अभिजीत दत्तात्रय भोसले  18 ड ⏰
आम्हा सर्वाना विजयी करा.
-🙏🙏🙏
आपल्यातलाच आपल्या हक्काचा अभिजीत 

⏰⏰⏰⏰

Share

Other News

ताज्या बातम्या