ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*मुंबई उच्च न्यायालयाचे पुण्यामधील चतुश्रुंगी पोलीस अधिकाऱ्यानविरोधात राज्य सी आय डी ( CID ) ला तपास करण्याचे आदेश दिले.*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 6/30/2022 10:19:41 PM

          चतुश्रुंगी पोलिसांच्या पथकाने बानेर येथील नंदन अक्युरा सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून फेकून दिल्याने ललित सत्यवान ससाणे ह्या 25 वर्षीय युवकाचा मनका तुटून गंभीर दुखापत . युवकाचा चतुश्रुंगी पोलिसांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा खळबळ जनक आरोप . आरोपाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सी आय डी ( CID ) ला तपास करण्याचे दिले आदेश . काय आहे प्रकरण : दिनांक 16/01/2021 रोजी ललित सत्यवान ससाणे याने चतुश्रुंगी पोलीस स्टेशन येथिल् एका दाखल गुन्ह्यतिल् फरार आरोपी पोलिसांच्या तब्यात देण्याकरिता महेश श्रीधर भोसले यांनी ललित ससाणे यांस संपर्क करून सदर आरोपी हे बानेर येथे हजर करणार होता , ही गोष्ट पोलिसांच्या दुसऱ्या पथकाला कळाली व त्याचा राग मनात धरून ललित ससाणे ला मारहाण करीत शिवीगाळ करीत तु दुसऱ्या पोलिसांकडे हजर करतोय का ? असे बोलून सारस विठलं साळवीने ताकदीच्या जोरावर उचलून पाचव्या मजल्यावरून खाली फेकले . या घटनेत ललित ससाणे यांचा मनका निकामी झाला असून , पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः ला वाचवण्या साठी चतुश्रुंगी पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांनी व PSI भोसले यांच्या सन्गनमताने ललित ससाणे व इतर 5 जनाविरुद्ध दरोड्याची तयारी केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला होता . ललित ससाणे यांच्या भावाने उच्च न्यायालयात मोहन जाधव , सारस साळवी , प्रकाश आव्हाड गडांकुश , इरफान मोमीन सर्व पोलीस अधिकाऱ्यानविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा व् सदर प्रकरणाची सी बी आय CBI ला चौकशी देण्यात यावी यासाठी " एड- मुबीन सोलकर " व " एड - युसूफ मिठी " यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन . आर . बोरकर व न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खांडपीठाने राज्य सी आय डी ( CID ) ला सदर प्रकरणाचा तपास करून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत . ललित ससाणे याने दरम्यान च्या काळामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांच्या कडे " एड- शुभम कराळे " व " एड प्रतिक जेथे " यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीची गंभीर दाखल घेत आयोगाने पुणे पोलीस आयुक्त यांना घटनेतील संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे घटनेच्या दिवशीचे टॉवर लोकेशन व पोलीस स्टेशन मधील सीसी टीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश दिले होते . पुढील सुनावणी - 21/07/2022 रोजी .

Share

Other News