उल्हासनगरने जिंकली सिंधी प्रीमियर लीग    राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नरेंद्र लुंडची शानदार कामगिरी 

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 24/01/2023 8:28 PM

उल्हासनगरने जिंकली सिंधी प्रीमियर लीग   
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नरेंद्र लुंडची शानदार कामगिरी 

देवळाली कॅम्प :- 
  अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात उल्हासनगरच्या शानदार संघाने   १९ धावांनी नागपूरच्या अहुजा वोरियर संघाचा पराभव करत  सिंधी प्रीमियर लीगच्या सहाव्या राज्यस्तरीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. त्यांना रोख रुपये २ लाख ५० हजार व चषक तर उपविजेत्या संघास १ लाख ५० हजार व चषक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. 
   देवळालीच्या आनंदरोड मैदानावर गेल्या ५ दिवसापासून सुरू असलेल्या सिंधी प्रीमियम लीग स्पर्धेचा अंतिम सामना नागपूर विरुद्ध उल्हासनगर असा रंगला.  प्रथम फलंदाजी करताना उल्हासनगर संघाने निर्धारित दहा षटकात ६ बाद १२६ धावा केल्या त्यात नरेंद्र लुंडने २०चेंडूत  ६७ धावा फटकावल्या.  उत्तरादाखल नागपूर संघ १०९ धावात गारद झाला. तृतीय स्थानी शिवानंदा संघ तर चतुर्थ स्थानी सिंधी छोकरा नाशिक हे संघ राहिले. 
पारितोषिक वितरण राष्ट्रीय सिंधी भाषा परिषदेचे कार्यकारी सदस्य अजित मणियार, सुवर्णा दोंदे, प्रकाश अहुजा, नवीन गुरुनानी,रतन चावला, किशन अडवाणी, हरीश तलरेजा,सेवक दर्डा,घनशाम महाराज शर्मा, मुकेश वालेचा,दिपक अहुजा, अनिल अहुजा, मनोहर कृष्णानी,विजय कुकरेजा,हिरो रिझवानी, टिकम केवलानी, जयराम चावला, नरेश कुकरेजा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी राजू नागदेव, विजय कुकरेजा,देवा सचदेव, विकी खत्री आदींसह समितीचे सदस्य प्रयत्नशील होते. धावते समालोचन मुन्ना शहा, सुनील कटारिया यांनी तर पंच म्हणून मयूर सोनवणे,अविनाश बंगाळ, अनिकेत खडताळे आदींनी केले.

चौकट :- 
उत्कृष्ट गोलंदाज :- दीपेश वासवानी (नागपूर) 
सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज- नरेंद्र लुंड (उल्हासनगर ) तर मालिकावीर -करण अडवाणी (उल्हासनगर)

Share

Other News

ताज्या बातम्या