आयुक्तांनी हे आताच केले तरच मनपाला शिस्त लागेत...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/10/2023 4:44 PM

मा. मुख्यमंत्री सो,
महाराष्ट्र राज्य.
मा. उप मुख्यमंत्री सो,
महाराष्ट्र राज्य.
मा. कामगार मंत्री सो,
श्री. सुरेश खाडे साहेब.
मा. मुख्य सचिव सो,
महाराष्ट्र राज्य.
मा. विभागीय आयुक्त सो,
पुणे विभाग.
मा.सामान्य प्रशासन अधिकारी सो,
मंत्रालय महाराष्ट्र राज्य.
मा. नगर विकास अधिकारी विभाग सो, 
महाराष्ट्र राज्य.
मा. जिल्हाधिकारी सो,
सांगली.
मा.आयुक्त सो,
श्री.सुनील पवार सर.
मा.उपायुक्त सो,
श्री.राहुल रोकडे सर.
मा.कामगार अधिकारी सो,
श्री. विनायक शिंदे सर. 

      सर्वांना सविनय सादर,....
अर्जदार- श्री. सुधीर देसाई
राहणार - मु. पो. मिरज.

    विषय- 1)अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर अन्याय रोखणे बाबत व एकास एक अशी दुजा भाव पणामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण होत असले बाबत. 
2) आयुक्त प्रशासक म्हणून आत्ताच कायद्याचे चौकटीत काम केलेत व प्रशासकीय ठराव केलेत तर योग्य शिस्त लागले अन्यथा  महानगरपालिकेस शिस्त लागणार नाही.
3) सन 2005 नंतर नियुक्ती व ज्यादा अपत्य असून सुद्धा खोठी माहिती व दोन अपत्य बाबत प्रतिज्ञापत्र सादर करून नोकरी मिळवलेली आहे यांची चौकशीचे आदेश देणे बाबत.

महोदय,
वरील नमुद मुदयास अनुसरून आपणास विनंती करू इच्छितो की, 
1) सध्या आपल्या महानगरपालिके मध्ये काही बदली, रोजनदारी,मानधन कर्मचारी काम करत आहेत व ह्यातील काही कर्मचारी काही ऑफिस स्टाफ मध्ये व काही अत्यावश्यक म्हणजेच ड्रेनेज,आरोग्य,अग्निशमन इ. ठिकाणी काम करत आहेत.
2) अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मधील मानधन कर्मचाऱ्यांना फक्त रविवारी सुट्टी मिळते इतर वेळी सुट्टी घेतली तर गैर पडून नुकसान होते मग त्यावेळी घरी कोणी आजारी,मयत किंवा आनन्द उत्सव असू दे गैर हजेरी मांडली जाते व फक्त साप्ताहिक सुट्टीच दिली जाते. कधी कधी तर आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग,ड्रेनेज विभाग अति पाऊस झालं की तात्काळ दिवस असो वा रात्र लगेच सेवेसाठी उपलब्ध असतो व लगेच सेवेचा निपटारा करून मार्ग मोकळा करून दिल जाते व कधी कधी तर मोर्चा, 1 ऑक्टोंबर सफाई मोहीम असो किंवा अन्य कारणस्थव त्यांना रविवारी सुद्धा व दिवाळी बझार पेठ व मुख्य रस्तावरील कचऱ्याचे उठाव करण्यासाठी रात्री सुद्धा बोलावले जाते व रविवारची सुट्टी सुद्धा वेवस्थित कुटुंबातील सदस्यांसाठी सुद्धा दिली जात नाही. 
3) आरोग्य विभागातील आपल्या जीवाची पर्वा न करता व त्यांच्यासाठी मनपा नी ई एस आय कार्ड नोंदणी केलेली नाही व प्रत्येक महिन्यांत स्वतःचे दवाखाने असून आरोग्य तपासणी केल्या जात नाहीत ह्यामुळे आरोग्य विभागातील कित्येक कर्मचारी आजाराने ग्रस्त व मरण पावलेले आहेत व कित्येक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत प्रत्यक्ष आपण पाहणी ग्राउंड लेव्हल वरती केलात तर आपणास निदर्शनास येईल मात्र अधिकारी वर्गास हयाबाबत काही देणे घेणे नाही आपला काम बनता भाड मे जाये....? ह्या प्रमाणे माहिती असून सुद्धा डोळे बंद ची भूमिका घेत आहेत. 
4) महानगरपालिके तील दुसरा वर्ग म्हणजे ऑफिस स्थाफ मधील बदली व मानधन कर्मचारी ह्या कर्मचाऱ्यांचे मूळ ऑर्डर वरती फक्त साप्ताहिक रविवार सुट्टी असे लिहिलेले आहे मात्र त्यांना सर्व शासकीय सुट्या व महिन्यातील 4 शनिवार व सण, उत्सव,जयंती, राष्ट्रीय सण, सर्व सुट्या दिल्या जातात एकंदरीत विचार केला तर महिन्यातील 30 दिवसातील 18 दिवस काम व सुट्या 12 दिवस कधी कधी तर सुट्यांचा आलेख पाहिला तर डोळे कपाळाला आटया पडतील. 
    एकंदरीत सांगण्याचे तात्पर्य इतकेच आहे की आरोग्य विभाग व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मर मर जीव धोक्यात घालून मरे पर्यंत मनापास प्रामाणिक राहून काम करायचे व मनपा ने त्यांचे वर दुर्लक्ष करून प्रत्येक वेळी त्यांनाच त्रास देणे, आरोग्य तपासणी, आरोग्य योजना, विमा व इतर सुविधा न देणे इ.
 5) त्याच प्रमाणे दुसरी कडे कर्मचारी सलग सुट्टीचा लाभ घेऊन पार्टी,सहली व आनन्द उत्सव साजरे करताना सर्रास दिसत आहे व दुसरा वर्ग मात्र मर मर काम करून फक्त रविवार घेऊन जगत आहे अशी दुजा भाव पणाची भावना मनपा ने न बाळगता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ही प्रत्येक महिन्यात दोन पगारी रजा देण्यात यावेत मग तो कर्मचारी कामाच्या सोई साठी कधी सुट्टी घेईल किंवा कामाची वेळ 8 तास  ऐवजी 7 तास करावे म्हणजेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यावरील  ताण कमी होईल व तो शेवटी माणूस आहे त्याला ही वयस्कर आई,वडील,पत्नी,मुळे, नातेवाईक आहेत त्यांना ही थोडा वेळ देऊ शकेल इतकेच म्हणणे आहे.
7) जो ऑफिस मधील कर्मचारी सर्व शासकीय सुट्या मिळतात त्यांचे एकत्र पगार कट करावे किंवा सुट्टी च्या वेळी त्यांना दुसरे अत्यावश्यक सेवेतील कामे देण्यात यावेत किंवा ऑफिस मध्ये थांबण्याचे आदेश द्यावेत. 
8) एकास एक अशी वागणूक न देता व महानगरपालिकेत काम न करता सुट्टीचा पगार देऊन आर्थिक नुकसान करून पैसेची उधळण का केली जात आहे. ह्याचा प्रश्न न समजणारा व न सुटणारा आहे असे समजते.
    मा आयुक्त व सर्व विभाग प्रमुख यांनी महानगरपालिकेच्या उत्पन्न वाढीकडे ज्यादा पाहिले पाहिजे विना कारण उधळण थांबवून महानगरपालिके मध्ये कायदा व सुव्यवस्था रुजवणे आवश्यक आहे विना कारण उत्पनाचे इतर साधन कडे दुर्लक्ष करून व कायदा व सुव्यवस्था ना बगल देऊन कर्मचारी वर्ग महानगरपालिकेची आर्थिक नुकसान करून दिवस फक्त भरून वेळ काढू पणा करून  काम न करता पगार घेतले जात आहेत व महानगरपालिकेच काम कमी व बाहेरील नगरसेवक व इतर राजकीय कामांची गुलामगीरी करून आर्थिक नुकसान व महानगरपालिकेची इज्जत, अब्रू, कायदा व सुव्यवस्थाची पायमल्ली करून दुसऱ्यांची गुलामगिरी करत आहेत ह्यामुळे वरिष्ठ अधिकारी वर्गाची मान खाली जाईल इतपत महानगरपालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी वागत आहेत ही बाब पूर्णपणे चुकीची आहे.
9) महानगरपालिके मध्ये इतर ही कित्येक उत्पनाचे साधन आहेत कर रूपाने इतर बाबी तपासून फक्त घरपट्टी व पाणी बिलाकडे न विचार करता व गोरगरीब, विधवा,दिव्यांग, गरिबांच्यावर कर न लादता इतर स्रोतांच्या बाबतीत म्हणजेच डिजिटल फलक फी,मंडप निंदणी फी, रिक्षा थांबा रस्त्यावर करतात त्यांना भु- भाडे आकारणी, बाजार मध्ये बसून घाण करून जाणारे व्यापारी यांचे वर ज्यादा फी ची आकारणी करून त्यांचा कचरा त्यांनी उचलून जवळच ठेवण्यात आलेले कंटेनर मध्ये किंवा मोठ्या कॅरी बॅग मध्ये बांधून ठेवण्याबाबत जागृती व कर मध्ये वाढ करावे व रस्त्यावरील विक्री करणारे फळ, भाजी पाला विक्रेते व हॉकर्स व्यवसाय करणारे त्यांची नोंदणी फी, मुंबई प्रमाणे फिरून व्यवसाय करणारे व्यवसाइक व चहा वाले यांचे बाबत फी आकारणी, 100टक्के व्यवसाय नोंदणी करण्याचे आदेश द्यावेत मग तो व्यवसाईक घरगुती असो किंवा दुकानातील असो नोंदणी पारदर्शक करण्याचे आदेश द्यावेत व तशी सक्त सूचना समभनधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत.
10) त्याच प्रमाणे चार चाकी गाडी वाले लाखोंची गाडी खरेदी करतात व त्याचे पार्किंग रस्त्यावर करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात व महानगरपालिकेच्या खुल्या भूखंडाचा वापर करून अतिक्रमण केले जात आहेत तर पार्किंग साठी फी/ कर आकारणी बाबत आदेश द्यावेत.
11) घरोघरी कुत्री व मांजर पाळून सकाळ सकाळी रस्त्यावर फिरवून त्यांचे मल मूत्र रस्त्यावर केले जाते व जाणारे येणारे नागरिकना रोगराई व दुर्गनधीस सामोरे जावे लागत आहे त्यांचे वर कर/फी/दंड आकारणे बाबत जनजागृती करण्यात यावेत.
12) विना परवाना मंडप, खुदाई करून मनापाची परवानगी न घेता आर्थिक नुकसान करून रस्ते खराब केले जात आहेत.
13) योग्य प्रशासनाने ज्या प्रकारे लाऊडस्पीकर द्वारे नागरिकांना तुम्ही प्रबोधन करता जर योग्य प्रबोधन, कायदा व सुव्यवस्था बद्दल जण जागृती केलात तर नक्कीच आर्थिक कर मनपास उपलब्ध होईल फक्त करमणूक साठी प्रबोधन न करता योग्य कामासाठी काम केले तर नक्की महानगरपालिकेला दर्जा उंचावेल.
14) सध्या असे दिसून येते की महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांचा जो तो उठतो कचरा करतो व पाहिजे तसे बोलतो व पाहिजे तशी वागणूक देतो मनपा अधिकारी व कर्मचारी यांना किंमत नाही नगरसेवक व सामान्य नागरिक सुद्धा बेइज्जत करतो असे का होते त्यांचे कारण काय हे शोधणे आवश्यक आहे. 
15) महानगरपालिकेतील आदेश, परिपत्रक,नियम, कायदे हे तेवढ्या पुरते असतात चार दिवस गेलेत की नागरिक व नगरसेवक केराची टोपली दाखवतात ह्याला काय अर्थ आहे ह्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
16) महानगरपालिके बरोबर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद व इतर ही शासकीय कार्यालय आहेत तेथील क्लास 1 अधिकारी ते क्लास 4 पर्यंत चे कर्मचारी यांना किंमत व एक अधिकारी व कर्मचारी म्हणून किंमत व वेगळीच समाजात प्रतिमा आहे व आदर व किंमत आहे मात्र महानगरपालिकेतील अधिकारी ते कर्मचारी ह्यांची प्रतिमा का खराब आहे का जो कोणी ही उठतो कचरा करतो ह्याकडे पाहणे गरजेचे व आवश्यक आहे. समाजात महानगरपालिकेची प्रतिमा उंचावणे व कायदा व सुव्यवस्था, कायदे,नियम  बद्दल आपण अधिकारी वर्ग म्हणून तुमची जबाबदारी आहे मात्र अधिकारी व कर्मचारी कमी पडतात असे दिसून येत आहे. फक्त दिवस काढणे व समाजाचे माझे काही देणे घेणे नाही अशी भूमिका न बाळगता गोरगरीब नागरिकांवर अनन्य करून पापाचे धनी न होता व उच्च स्थरातील लोकांच्यासाठी सर्व नियम मोडून सहकार्य व मदत करणे हे चुकीचे आहे.
17) नागरिकाच्या मनात महानगरपालिके बद्दल ब्रष्टाचार व अधिकारी व कर्मचारी वर्ग मुळ मनात चांगली भावना नाही व नागरिक हे तळतळाट व वाईट प्रतिमा आहे सुधारणे आवश्यक आहे.
18) सध्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी वेवस्थित काम करत नसल्यामूळे महानगरपालिकेचा मोठ्या प्रमाणावर कर चुकवला जात आहे व कर गोळा करण्यास व परवाने, फी, नियमांची अमलबजावणी न केल्या मूळ अधिक नुकसान करत आहेत ह्यामुळे मनापास आर्थिक उत्पन्नास मुकावे लागत आहे. 
19) त्याच प्रमाणे नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत ते महानगरपालिचे मालक असल्या सारखे का वर्गात व नगरसेवक यांचे नातेवाईक, असिस्टंट नगरसेवक च्या वरती स्टंट बाजी करून अधिकारी व कर्मचारी वर्गावर दबावतंत्र व धमकी, शिवीगाळ, श्री. झगडे साहेबांच्या अंगावर धावून जाणे, धमकी देणे, शिवीगाळ पर्यंत यांची मजल गेलेली आहे असे का घटना घडत आहेत का महानगरपालिकेची भीती नाही जो तो उठतो कचरा करतो.
20) त्याच प्रमाणे सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी वशिला पैसे देऊन व म्यानेज करून व नगरसेवक यांची शिफारस पत्रे जोडून 9 ते 10 वर्षे एकाच ठिकाणी सर्व्हीस करत आहेत सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची रोटेशन व शासन निर्णय अनव्ये बदली करण्यात यावेत सांगलीचे कुपवाड मध्ये कुपवाड चे मिरज मध्ये व मिरज चे सांगली मध्ये तसेच मिरज चे कुपवाड ला ह्या प्रमाणे बदल्या करण्यात यावेत.
21) महानगरपालिकेतील अधिकारी सुद्धा नियुक्ती देताना कागदपत्रे तपासत नाहीत जातीचा दाखला कसा काढला, पोलीस केस आहे किंवा नाही, सन 2005 नंतर नियुक्ती घेऊन हजर झालेले कर्मचाऱ्यांना तीन पेक्षा ज्यादा अपत्य आहेत खोटी माहिती देऊन सरळ सरळ खोटी दोनच अपत्य असले बाबत खोटी प्रतिज्ञापत्र देऊन महानगरपालिकेची त्यांनी फसवणूक केलेली आहे व सेवा बजावत आहेत मात्र सांगली महानगरपालिका अधिकारी मुग गिळून गप्प आहे सांगली महानगरपालिकेस भष्टाचाराचे ग्रहण लागलेले आहे तीन अपत्य बाबत पारदर्शक चौकशी अधिकारी नेमलेत तर व आधार लिंक वरून व रेशनकार्ड पुरवठा विभाग मधून चौकशी चे आदेश दिला की दूध का दूध आणि पाणी वेगळे होईल.
आपण एक समाजातील प्रतिष्टीत अधिकारी वर्ग म्हणून लोक आपल्याकडे पाहतात आपण ही समाजात आपली त्याच बरोबर महानगरपालिकेची प्रतिष्ठा सांभाळणे तितकेच आवश्यक आहे थोडं आपण ह्याकडे पाहिलात तर नक्की आपन जी प्रामाणिक नोकरी, सेवेचे सार्थक होईल अस वाटते नाहीतर इतरांच्यात व आपल्यात काय फरक आहे ह्याप्रमाणे सेवा नोकर केला तर त्यास काय अर्थ आहे शेवटी देवास उत्तर द्यावे लागणार आहे शेवटी हितच कर व हितच फेड अशी सध्या समाजात बोलले जात आहे कृपा  करून देवाच्या व आपल्या प्रामाणिक आई व वडील यांचे मूळ आपण ह्या पदावर आहोत कोणी ही आपल्या पदावर काम करू शकत नाही देवाने व आपल्या कष्टाने आपण त्या पदावर आहात भाकरी दिलेली आहे त्या पदानुसार जाण ठेऊन काम केल तर नक्की महानगरपालिकेची प्रतिष्ठा उंचावेल असे वाटते. 
22) शहरात जागो जागी छोटे व मोठे डिजिटल,स्टिकर फलक, जाहिराती लावलेले आहेत व शहर विद्रुपीकरण करत आहेत व काही जाहिराती व डिजिटल फलक वरती देवांची नावे व देवांचे फोटो मंदिर असतात ऊन,पाऊस व वाऱ्यात पडतात व रस्त्यावर विखुरतात तसेच काहीवेळा जिवीत हानी व दुर्घटना ही घडत आहेत दर जे डिजिटल फ्रिन्टिग व्यवसायिक चालक व मालक आहेत यांना सक्त सूचना देण्यात यावेत की ठळक अक्षरात प्रिंट चालकाचे नाव,पत्ता,मुदत,भरलेले पैसे नमुद करणे बाबत सूचना देण्यात यावेत व उठतो सुटतो पाहिजे तिथं डिजिटल फलक लावतो त्यावर कार्यवाही व महसूल जमा करून घ्यावे व शासनाचा मोठा महसूल बुडवतात त्यावर कार्यवाहीचे आदेश द्यावेत. काही वेळा गुन्हेगारांची फलक झळकत असल्याने समाजात कायदा व सुव्यस्थेचं प्रश्न निर्माण होत आहेत.
त्याच प्रमाणे महानगरपालिकेस विविध मार्गाने कर रूपाने महसूल गोळा करता येऊ शकतो प्रत्येक वेळी सामान्य नागरिकांच्या वर कराचे बोजे वाढवणे हे चुकीचे आहे आपल्या अधिकारी व कर्मचारी वर्गात जनजागृती व गुलामगिरी न करणे तसेच शिस्त लावले गेले तर नक्कीच महानगरपालिकेच्या महसुलात/ उत्पन्नात वाढ होईल व महानगरपालिकेचा दर्जा व प्रतिष्ठा उंचावेल व महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श महानगरपालिका निर्माण होईल व इतर ही महानगरपालिका आदर्श घेतील प्रत्येक वेळी सांगली महानगरपालिका वाईट व करप्शन च्या नेहमीच चर्चेत असते चांगल्या कामा बद्दल कमी व वाईट कामा बाबत वर्तमान पत्रातून वाचण्यात येते.
   माझ्या अर्ज/ निवेदनातून काही ज्यादा बोलले गेलं तर कृपा करून वाईट समजून घेऊ नये व वेगळा अर्थ काढू नये आपल्या पैकीच एक नागरिक म्हणून माफ करावे जे मनात आहे ती सत्य परिस्थिती मांडलेली आहे कृपा करून योग्य विचार झालेत तर नक्कीच समाजात महानगरपालिका आदर्श व विकास मॉडेल समाजात दिसेल हीच अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र.
स्थळ: मिरज
दि.02 /10/2023     


आपला नम्र,  
श्री. सुधीर देसाई

Share

Other News

ताज्या बातम्या