लोकहो,फास्ट फूड खाणे टाळा: सिद्धार्थ मेश्राम

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 02/10/2023 10:22 PM

लोकहो,फास्ट फूड खाणे टाळा: सिद्धार्थ मेश्राम

( पोषण अभियानात प्रतिपादन)
रोहित बोंबार्डे /
तुमसर: चांगल्या आणि निरोगी जीवनासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे खूप गरजेचे आहे.अनेक लोक बाहेरचे जेवण किंवा फास्ट फूड किंवा तळलेले पदार्थ खाणे पसंद करतात.पण हे पदार्थ आपल्या शरीरासाठी नेहमीच हानिकारक असतात.मातांनी आपल्या शरीराची काळजी घ्यावी.सुदृढ माता व सुदृढ बाळ ही संकल्पना वास्तवात साकार करायची असेल तर लोकहो,फास्ट फूड खाणे टाळा.असे प्रतिपादन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी केले.ते नगर परिषद गांधी प्राथमिक शाळेत आयोजितराष्ट्रीय एकात्मिक बाल संगोपन पोषण अभियान कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते  म्हणून राहुल डोंगरे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका सौ माला भावसागर, डॉ चकोले ,सौ.संगीता भवसागर,सौ वैशाली भवसागार, सुपरवायजर सौ.रचना गहरवाल होत्या.
आजकाल,मुलांना नेहमी पौष्टिक अन्न खाण्याची गरज आहे.आपल्या भावी पिढ्या निरोगी आणि तंदुरस्त राहण्यासाठी आपण चांगल्या खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन दिले पाहिजे.लोकांनी लहानपापासूनच मुलांना पाणी,कर्बोदके,चरबी,प्रथिने,जीवनसत्वे आणि खनिजे हे मुख्य पोषक घटक आहेत जे निरोगी,संतुलित आहार बनवतात.ताजे अन्न मुलांना खाऊ घालणे हे प्रत्येक आई - बाबांची नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रमुख वक्ते राहुल डोंगरे यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर धंदर म्हणाले की, पालक लोकांनी मुलांच्या हातात मोबाईल देणे टाळावे.आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईल घेत असेल तर येणारी पिढी समोर अनेक समस्या निर्माण होतील.आपली मुले मोबाईल मध्ये काय बघतात ,याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची विनंती  सुद्धा केली.पोषण अभियाना अंतर्गत प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.यामा ध्यमातून सकस आहार व मुलांचे संगोपन,त्यांच्या आवडीनिवडी आणि कल्पकतेतून टाकावू पासून टिकावू वस्तू बनवून लोकांना अप्रतक्ष्यरित्या शिक्षणच दिल्या जात असल्याचे जिवंत दर्शन प्रदर्षणीतून दिसून आले.पाहुण्याच्या हस्ते प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. प्रदर्शनीचे अवलोकन करून पाहुण्याचे स्वागत रोपटे देवून व स्वागत गीत सादर करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ रचना गहरवाल सुपरवायजर यांनी केले.तर कार्यक्रमाचे संचालन मनिषा भवसागर यांनी केले.आभार प्रदर्शन विशाखा शेंडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजश्री बांगळकर ,वंदना बडवाईक,शालिनी गोडबोले,उषा मानकर,बबिता सारंगपुरे, नाजिया खान, भारती डोंगरे,सरिता माटे,  मालता घोडीचोर,दीपा.मेश्राम,मनिषा गजभिये,सुनीता मस्के, पदमा डोंगरे,धनश्री नेवारे,मिरा सार्वे,मंगला गभणे,मंजुषा गणवीर,किरण बावनकर,सुमन पडोळे,लक्ष्मी धूर्वे,संगीता सहारे, मंदा जटाल,शालू गाडगे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Share

Other News

ताज्या बातम्या