ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

वडूज पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्याची कारवाईच्या नावाखाली वसुली


  • अतुल पवार (गुरसाळे)
  • Upadted: 7/11/2020 1:12:25 PM

वडूज तालुका खटाव येथील काही दिवसापासून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विना मास्क गुटखा पान खाऊन थुंकनारे टू व्हीलर वर डबल सीट फिरणारे गुटखा तंबाखू पानपट्टीत विकणारे अशा अनेक प्रकारच्या नागरिकांवर कारवाही करण्याचे चालू आहे त्यामध्येच एक पोलीस कर्मचारी स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी कारवाया करीत आहे कारवाया करून नागरिकांना दंड करून त्यांच्याकडून जमा केलेला मुद्देमाल पोलीस स्टेशनला जमा न करता हा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे हे महाशय रात्री अपरात्री फिरून गाड्या अडवून नागरिकाकडून पैसे वसुली करतात याच्या अनेक तकरारी नागरिकांनी केल्या असून वरिष्ठांनी अध्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही यामुळे नागरिकांच्या चर्चा आहे की यांच्यावर कारवाई होणार का का वरिष्ठ अधिकारीच यांना सामील आहेत

Share

Other News