यंदाच्या गणेशोत्सवात जळकोट शहरातील शिवनेरी मंडळाने साकारलेला आकर्षक ‘पाण्यावरचा गणपती’ भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी परिसरातील नागरिकांसह महिलांची मोठी गर्दी होत आहे.
डीजेवर बंदी असल्याने यंदाच्या उत्सवात पारंपरिक वाद्यांना विशेष महत्त्व मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाची आरती व पूजा करण्यात येत असून, महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घेतला.
शिवनेरी मंडळाच्या या अनोख्या गणेशोत्सवाचे परिसरातून कौतुक होत असून, मंडळाने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले आहे. गणेश दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.