मनपाकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 2:34 PM

      सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 
प्रारंभी शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच पहिल्या मजल्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास सुद्धा अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सहायक आयुक्त विद्या घुगे सानप, मानसिंग पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके, आस्थापना अधिकारी विनायक शिंदे,
जलनिसारण अभियंता चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापूरे, चिंतामणी कांबळे, विनायक जमदाडे, विकास कांबळे, माणिक गोंधळे आदींसह मनपा कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या