सांगली लोकसभेसाठी मारूती देवकर यांच्या नावाची चर्चा,,

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 2:42 PM

       सांगली जिल्ह्यातील एक हरहुन्नरी धडाडीचे नेतृत्व असणारे  मारुती देवकर यांच्या नावाची चर्चा राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी केलेली आहे.
      मारुती देवकर यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 ही थेट सरपंच पदाची  निवडणूक अत्यंत ताकदीने स्वतःच्या जीवावर त्यांनी लढवली होती तसेच त्यांचा राजकीय अभ्यास, प्रशासकीय कामांचा गाढा अभ्यास सामाजिक सहभाग,सामाजिक क्षेत्रामध्ये असणारे अग्रक्रम काम करण्याची एक वेगळी झलक जिल्हाभर असणारा संपर्क या सर्व गोष्टींची दखल घेऊन  राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांनी सांगली येथील एका नामांकित हॉटेलमध्ये त्यांची सांगली लोकसभेसाठी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे .
    पक्षाचा एबी फॉर्म देण्याचे ही केले मान्य.
      अशी चर्चा असताना मारुती देवकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता पत्रकारांना कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.
तो राष्ट्रीय पक्ष कोणता या प्रश्नाला छेडले असता मारुती देवकर यांनी योग्य त्या वेळी समजेल असे त्यांनी उत्तर दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या