डॉ. आय.सी.शेख यांनी अधिकारी म्हणून काम करताना माणूसपण हरवू दिले नाही : डॉ. सुनिलकुमार लवटे

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 14/04/2024 8:34 PM



कोल्हापूर : " डॉ. आय सी शेख यांनी अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्यातील माणूसपण हरवून दिलं नाही, असे प्रतिपादन  शिक्षण तज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी केले.राम गणेश गडकरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या डॉ.आय.सी .शेख  यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लवटे बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सीमा येवले होत्या.
      यावेळी बोलताना . डॉ. सुनिलकुमार लवटे म्हणाले , " शिक्षकाने आपल्या जीवनात ज्ञानदानाचे काम करत असताना शिक्षकाला आई होता आलं पाहिजे.संवेदनशील शिक्षकच चांगला विद्यार्थी,चांगला नागरिक घडू शकतो . डॉ. आय. सी. शेख यांनी शिक्षक व अधिकारी म्हणून ही संवेदनशीलता जपली . "
      कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सीमा येवले म्हणाल्या , " कामातील निर्दोष,निटनेटकेपणा व संयम या त्रिसूत्रीमुळे  डॉ.आय.सी. शेख  आपल्या 35 वर्षाच्या सेवेमध्ये चांगला शिक्षक व अधिकारी म्हणून काम करू शकले.शिक्षक व अधिकाऱ्यांनी आपल्या कामात  या  त्रिसूत्रीचा वापर केला पाहिजे "
       मानपत्र , गौरव चिन्ह , कोल्हापुरी फेटा , शाल व श्रीफळ देऊन डॉ. आय.सी. शेख यांचा शिक्षणतज्ञ व जेष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ. सिमा येवले यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
       सत्काराला उत्तर देताना डॉ. आय.सी .शेख म्हणाले , " छत्रपती शाहू महाराजच्या नगरीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे भाग्य मला लाभले व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या शासकीय पातळी अव्वल ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. " 
      कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी केले. राजेंद्र कोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. 
      यावेळी प्राचार्य आर आर भोई , गजानन शिदे , प्रा. गीतांजली पाटील ,रमेश कोरे , सुधाकर सावंत , भरत रसाळे प्रसाद पाटील इत्यादी मनोगते व्यक्त केली.
      प्राचार्य मंजुषा माळी यांनी मानपत्राचे वाचन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मगदूम व सुरेखा कुंभार यांनी केले . राजेश वरक यांनी उपस्थित त्यांचे आभार मानले .

Share

Other News

ताज्या बातम्या