भाजप चारशे पार करणार, यशाचे शिल्पकार होण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करा, रुईकर कॉलनीतील मिसळ पे चर्चा कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 14/04/2024 8:43 PM



लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुती कडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. महायुती तर्फे आज रुईकर कॉलनी परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत, मिसळ पे चर्चा हा नागरिकांशी संवाद साधणारा कार्यक्रम झाला. परिसरातील रस्ते, उद्यानं, क्रीडांगण यासह विविध विषयांवर खासदार महाडिक यांनी, नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी बहुतांश नागरिकांनी महायुतीकडून झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षातील कामगिरीवर आणि त्यांनी घेतलेल्या ठोस निर्णय अनेकांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देवू, अशी ग्वाही उपस्थित नागरिकांनी दिली.
गेली ६८ वर्ष कॉंग्रेसने देशभर भ्रष्टाचार आणि घोटाळे केले, गरिबी हटावचा फक्त नारा दिला. प्रत्यक्षात वोट बँकेसाठी काँग्रेसने ठराविक समाजाचेच लांगुलचालन केले. मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्पनेतून आणि विविध योजना यशस्वी करून, भारताची परिस्थिती बदलून दाखवली. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा बदलली आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे काम करून दाखवले. नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या यशात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना भरघोस मतांनी निवडून देऊया, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. गेल्या पाच वर्षात सुमारे पावणेदोन कोटीचा निधी रुईकर कॉलनी परिसरासाठी देण्यात आलाय. रस्ते, उद्यानं आणि क्रीडांगणाचं काम पूर्ण झालंय. त्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नरेंद्र मोदी हेच या देशाला योग्य नेतृत्व देऊ शकतात ही खात्री असल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देऊ अशी ग्वाही उपस्थित नागरिकांनी दिली. दरम्यान कोल्हापुरातील उद्योग क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राबद्दल पाठपुरावा करून जास्त जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन संजय मंडलिक यांनी दिलं. यावेळी मंगल महाडिक, सौ.अरुंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक, सत्यजित कदम, विजेंद्र माने, महेंद्र चव्हाण, जयश्री गाट, सीमा कदम, उमा इंगळे, आशिष ढवळे, प्रमोद देसाई, प्रशांत घोडके, नितीन पाटील, प्रितेश कर्नावट यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या