श्रीमतीबाई कळंत्रे अकका विध्यामंदिर व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व कॉलेजमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/04/2024 11:26 AM

श्रीमंतीबाई कळंत्रे अक्का विद्यामंदिर नेमिनाथ नगर सांगली,श्रीमती राजमती नेमगोंडा  पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये आज दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली.
       प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक मा श्री.एस डी पाटील सर व मा श्री.एस.बी. चौगुले सर यांनी केले. हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक मा.श्री.एस एस पाटील सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण व त्यांचे कार्य याचा सुंदर असा परिचय आपल्या ओघवत्या शब्दात करून दिला. कळंत्रे अक्का प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मा.सौ..हुलिकिरे मॅडम व मा. श्री  एसडी पाटील सर यांनी अतिशय सुंदर शब्दात आपले मनोगत मांडले. या कार्यक्रमाच्या वेळी हायस्कूलचे पर्यवेक्षक मा. श्री कुदळे सर व ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख मा. श्री.डाॅ. अविनाश पाटील सर तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ पेटारे मॅडम यांनी केले.
  अशी माहिती श्रीमंतीबाई कळंत्रे अक्का विद्यामंदिर सांगली या संस्थेचे व्यवस्थापन कमिटी सदस्य मारुती देवकर यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या