घरपट्टी सर्वेक्षण करताना खाजगी एजन्सीच्या माणसा बरोबर मनपाचा कर्मचारीही बरोबर असावा, नागरिक जागृती मंचची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/04/2024 6:39 PM

प्रति
मा.आयुक्त 
     सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 

विषय :- सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सध्या सुरू असलेल्या घरपट्टी सर्व बाबत....

महोदय.

आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरपट्टी सर्वेक्षण खाजगी एजन्सी मार्फत सुरू आहे 
मनपाचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेले घरपट्टी विभाग आहे मात्र खाजगी एजन्सी मार्फत सर्वेक्षण चालू असताना त्या भागातील मनपाचे अधिकृत घरपट्टीचे कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक वाटते.
आमच्याकडे सर्वेक्षणाला गेल्यानंतर सदर कर्मचारी खाजगी एजन्सीची आहेत त्यांच्याकडे आय कार्ड आहेत मात्र मनपाचे अधिकृत कोणी कर्मचारी नसल्यामुळे प्रॉपर्टी धारक शंका व्यक्त करत आहेत सध्या सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने फसवणारे अथवा चोरीच्या उद्देशाने फिरणारे प्रकार घडत आहेत त्यामुळे सदर सर्वेक्षण करताना मनपाचे अधिकृत कर्मचारी उपस्थित असावेत अशी विनंती आहे.
त्याच पद्धतीने ज्या घरांच्या सर्वेक्षणामध्ये म्हणजे पूर्वीची घरपट्टी ज्या मोजमाप पद्धतीने लावलेली आहे आणि आता नव्याने मोजमाप केल्यानंतर त्यामध्ये जर फरक पडत असेल तर संबंधित ज्या जुन्या कर्मचाऱ्याने मोजमाप करून घरपट्टी लावलेली आहे त्यावर काय कारवाई होणार आहे ह्याचा सुद्धा खुलासा करण्यात यावा.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या