आणि सुरजचे वडील चालू लागले....

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/04/2024 10:20 AM

मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालय ठाणे येथे गुडगा बद्दल शस्त्रक्रिया मोफत यशस्वीरीत्या पार पडली आणि माझे सहकारी सुरज शेख यांचे वडील चालू लागले
         शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महापालिका क्षेत्र प्रमुख सुरज शेख यांचे वडिलांचे दोन्ही गुडघे बदलण्यासंदर्भात डॉक्टरांनी सांगितले होते यासाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये खर्च सांगितले होते ही बाब माझे सहकारी सुरज शेख यांनी सांगितले यावेळी मी तात्काळ आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेश दादांना संपर्क केला असता मंगेश दादांनी ठाणे ऑफिस मधील सागर झाडे सराना फोन करून सदर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करण्यासाठी सांगितले आम्ही तात्काळ सागर सरांना संपर्क साधून सर्व कागदपत्र पाठवून शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि आज रुग्ण वाकरचा आधार घेऊन चालूही लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून आम्हाला आनंद झाला
         मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयत अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय आहे येथे सौजन्य पूर्ण वागणारे डॉक्टर नर्सिंग स्टाफ आहेत. तसेच रुग्णांना जेवणाची व्यवस्था ही मोफत केली जाते तसेच नातेवाईकांनाही राहण्याची व जेवणाची सोय उत्तम प्रकारे आहे 
      खरंच आम्ही भाग्यवान आहोत आमचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमचे नेते सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्माननीय मंगेशजी चिवटे सर शिवसेना वैद्यकीय मत कक्षाचे राज्यप्रमुख सन्माननीय रामहरी राऊत सर यांच्यासोबत काम करतो याचा आम्हाला अभिमानच आणि गर्व आहे

अमोल पाटील
संपर्कप्रमुख पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन


Share

Other News

ताज्या बातम्या