संवेदनशील भागातील मतदान पथके रवाना, गडचिरोलीत 68 मतदान केंद्रावर 295 मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 16/04/2024 1:07 PM


गडचिरोली दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आज सुरूवात करण्यात आली. गडचिरोलीतील विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 68 मतदान केंद्रावरील 72 निवडणूक पथकाच्या 295 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3-एम.आय.- 17 आणि 4-ए.एल.एच. हेलिकॉप्टरच्या मदतीने बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले. 
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असून अहेरी विधानसभा क्षेत्र अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षीतपणे पोहचविण्यात येत आहे .

Share

Other News

ताज्या बातम्या