लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल सज्ज

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 16/04/2024 7:10 PM




अतिसंवेदनशिल मतदान केंद्रासह सर्वत्र राहणार नजर
15000 सुरक्षा जवानांच्या सुरक्षिततेत पार पडणार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया
158 आत्मसमर्पित माओवादी देखिल बजावणार आपला मतदानाचा हक्क.


गडचिरोली जिल्ह्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघाकरीता दिनांक 19/04/2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गडचिरोली जिल्हा हा माओवादग्रस्त असल्याने माओवादी हे सुरक्षा दलाच्या जवानांवर प्राणघातक हल्ला करणे, स्फोट घडवून आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे इ. देशविघातक कृत्य करीत असतात. या निवडणूकीच्या अनुषंगाने सदर मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणेे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे.
ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ., सी.आय.एस.एफ., एपीएसपी, एस.आर.पी.एफच्या 40 कंपणी तसेच मुंबई रेल्वे पोलीस, नागपूर रेल्वे पोलीस, पिंपरी चिंचवड, पुणे शहर पोलीस, छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस, नवी मुंबई पोलीस, पुणे रेल्वे पोलीस असा विविध ठिकाणाहून एकुण 1500 च्या वर तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव व इतर ठिकाणाहून 1750 च्या वर गृह रक्षक दलाच्या सुरक्षा जवानांसह एकुण 15000 च्या वर सुरक्षा जवानांचा फौजफाटा जिल्ह्रातील संपूर्ण मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेला आहे.  निवडणूक बंदोबस्ताकरिता तैनात संपूर्ण सुरक्षा जवानांना निवडणूकीच्या अनुषंगाने उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.  यासोबतच जिल्ह्रातील 361 अतिसंवेदनशिल मतदान केंद्रावर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलेले असून  सी-60/ क्यु.ए.टी./ वि.कृ.द./ क्यु.आर.टी पथकाच्या 36 तुकड¬ामार्फत जिल्ह्रातील अतिसंवेदनशिल जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
यासोबतच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने देखिल सुक्ष्म पाहणी करण्यासाठी अत्याधूनिक 130 ड्रोनसह ड्रोन टीम तसेच माओवाद्यांच्या ड्रोनवर प्रतिहल्ला करण्यासाठी 05 अँटी ड्रोन गन देखिल सज्ज राहतील. निवडणूक काळात मतदान केंद्रापर्यंत जाण्या-येण्याकरिता वापरण्यात येणा­या मार्गावर डी.एस.एम.डी./व्हेईकल माऊंटेड डी.एस.एम.डी चा उपयोग करुन सुमारे 750 कि.मी. रोड ओपनिंग अभियान राबविण्यात येणार आहे.  यासोबतच भारतीय वायुसेनेचे 03 एम.आय. 17 व 2 ए.एल.एच आणि भारतीय लष्कराचे 02 ए.एल.एच असे एकुण 07 हेलीकॉप्टर हे गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीला तैनातीस असून गडचिरोली पोलीस दलाच्या 02 हेलीकॉप्टरसह एकुण 09 हेलीकॉप्टरच्या सहाय्याने गडचिरोलीतील विविध संवेदनशिल व अतिसंवेदनशिल ठिकाणी मतदान कर्मचा­यांना पाठविण्यात येणार आहे.  गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील आंतरराज्य सिमेवरील राज्यांमार्फत देखिल निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर माओवाद विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे.
यासोबतच आज दिनांक 16/04/2024 (पी-3) रोजी सकाळपासून भारतीय वायुसेनेच्या एम.आय 17 आणि भारतीय लष्कराच्या ए.एल.एच. हेलीकॉप्टरच्या मदतीने 69-अहेरी विधानसभा मतदार संघातील 68 मतदान केंद्रावरील 295 मतदान कर्मचा­यांना मतदान केंद्रावर पाठविण्याची प्रक्रिया सुरु आहे.  निवडणूक काळात पोलीस दल हे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात व यशस्वीपणे पार पाडण्याकरिता बंदोबस्तात तैनातीस असल्याने त्यांना स्वत:चे मतदान करता येत नव्हते.  याचा सारासार विचार करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतीने गडचिरोली पोलीस दलासाठी दिनांक 13 एप्रिल ते 15 एप्रिल 2024 असे तीन दिवस आरमोरी, अहेरी व गडचिरोली याठिकाणी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याने गडचिरोली पोलीसांमार्फत एकुण 615 टपाली मतदान करण्यात आले आहे.  यासोबतच 158 आत्मसमर्पित माओवादी हे लोकसभा सार्वात्रिक निवडणूक – 2024 करिता मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने निवडणूक ही शांततापूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, विविध राज्यातील पोलीस दल तसेच राज्यातील विविध विभागातील पोलीस दल, गृह रक्षक दल हे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज आहेत. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
।।।।।।।।।।।।।।।।

Share

Other News

ताज्या बातम्या