तर निवडून येणाऱ्या खासदारांना नवीन कोरी ' थार' गाडी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2024 7:53 AM

#खासदार_साहेब #आपली_सांगली #करा_चांगली✨
सांगली लोकसभा मतदार संघातून २०२४ ला नवीन निवडून येणाऱ्या खासदार साहेबांनी खालील कामे केल्यास त्यांची #सांगली_शहरातून शिवकवच कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, वखारभाग, सांगली यांच्या वतीने #हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक काढून त्यांना #नवीन_कोरी #महिंद्रा_कंपनीची_थार गाडी (लोक वर्गणीतून) देऊन सन्मान करणेत येईल.
१. माधवनगर रस्ता चिंतामणीनगर रेल्वे पूल बंद पडलेलं काम चालू करून पूल दोन महिन्यात जुलै २०२४ ला वाहतूकसाठी खुला करायचा.
२. सांगली साठी नवीन पंढरपूर हायवे लगत MIDC
३. जिल्ह्यातून मंजूर असलेले 3  highway लवकर पूर्ण करून. नवीन highway मंजूर करून काम चालू करने..
४. सांगली शहराला जोडणारे तालुका मधून येणारे सर्व महत्वचे रस्ते मोठे करणे, सांगली इस्लामपूर रोड वरील टोल नाका मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे आष्टा जवळ बसवणे
५. नवीन होणाऱ्या highway जवळ ऍग्रो क्लस्टर मंजूर करून नवीन उद्योग आणायला प्रयत्न कराने 
६. सांगली जिल्ह्यात Dry Port सुरु करणे
७. सांगली साठी एअरपोर्ट मंजूर करणे
८. सांगली जिल्ह्यातील होतकरू  क्रीडा पट्टूच्या साठी सर्व क्रीडांगणे अध्यावत करणे
९. सांगली मध्ये IT पार्क चालू करणे जेणेकरून आमची मुले आमच्या गावात राहतील पोटा पाण्या साठी पुणे मुंबई ला जाणार नाहीत
१०. सांगली शहराला थेट  चांदोली धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी चांदोली धरणातून थेट पाणी पुरवठा योजनेला मंजुरी आणून काम चालू करणे...

Share

Other News

ताज्या बातम्या