नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज दि.२६ डिसेंबर, २०२५ रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते वीर बालकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ.प्रकाश निहलानी, तसेच डॉ. अर्चना साबळे, डॉ. हनमंत फडेवार, डॉ. सतीशकुमार मेकेवाड, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रवी मोहरीर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांनी वीर बालकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.