जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडत सांगली भाजपाच्या वतीने जाहीर निषेध

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2024 2:39 PM

मनुस्मृति विरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड यांनी भारताचे संविधान रचक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाढून अपमान केला. देशांध झालेल्या आव्हाडांनी यापूर्वीही निळा ध्वज फेकून दिला होता. संविधान विरोधी आणि आंबेडकर विरोधी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची मानसिकता दाखवत श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अपमान केला. यावर जितेंद्र आव्हाड यांचा फोटो फाडून शास्त्री चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर  जाहीर निषेध दर्शवण्यात आला.
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग पुढच्या कित्तेक पिढ्या विसरू शकत नाहीत अश्या या महामानवाने ज्या महाडच्या तळयांवर सत्याग्रह केला त्याच ठिकाणी एका लोकप्रतिनिधी ने असं कृत्य करणे ही बाब फार दुर्दैवी आहे आणि दोन दिवस होऊनही त्याबाबतीत त्यांचे नेते तोंडातून चकार शब्द काढत नाही ही शोकांतिका आहे ज्या शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेऊन मोह.माया जमवली त्यांचे उपकार असे फेडता त्यांची प्रतिमा फाडत असाल तर आंबेडकरी जनता योग्य वेळी नक्कीच त्याची जागा त्याना नक्कीच दाखवेल..
              

Share

Other News

ताज्या बातम्या