काळ्या खणीचे सुशोभीकरण व पुनरुज्जीवन करण्यात यावे, लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांची मागणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/05/2024 5:29 PM


सांगली प्रतिनिधी                                  
सांगली मधील ऐतिहासिक असणाऱ्या काळाखणीचे सुशोभीकरण आणि  पुनरुज्जीवन करून योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन दिले आहे .
 सांगली शहराच्या पूर्व बाजूला दोनशे वर्षांच्या पूर्वीपासून नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत असणारी,, गणेश मंदिर गणेश दुर्ग अनेक प्रशासकीय इमारतींच्या बांधकामात काळा दगड पुरवणारी आणि थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन पटवर्धन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली काळी खाण वसली आहे. एकेकाळी सांगलीच्या सुजलाम सुफलामतेची ओळख असणारी ही काळी खाण नंतरच्या कारभाऱ्यांच्या नाकरतेपणामुळे सध्य परिस्थितीत सांडपाण्याचे तळे झाले आहे. असे खेदाने म्हणावेसे वाटते.             
      2008 च्या सुमारास पंधरा कोटी रुपयांचा एक प्रस्ताव महापालिकेमार्फत केंद्रीय पर्यावरण खात्याकडे तलाव संवर्धन करण्यासाठी पाठवण्यात आला होता. बोटिंग,
कारंजे ,वॉकिंग ट्रॅक यांचा समावेश असणारा प्रस्ताव प्रत्यक्षात मात्र आला नाही. कोरोना पूर्वी व कोरोना पश्चात काळ्या खाणीच्या सुशोभीकरणासाठी बगीच्या, वॉकिंग ट्रॅक बसण्यासाठी बेंच असा प्रस्ताव होता तत्कालीन आयुक्तांच्या मार्फत यासाठी जे प्रयत्न झाले ते तकलादू स्वरूपाचे होते. त्यामुळे कोणतेही काम शाश्वत स्वरूपाचे झाले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळाखणीतील  पाणी स्वच्छ करणे व शुद्धीकरण करणे तसेच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत पुनरुज्जीवीत करणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.    
   काळ्या खणीतील  पाणी शुद्ध करता आले तर सगळ्या सांगलीला मुबलक पाणीपुरवठा शाश्वत पद्धतीने करता येईल.    तसेच केवळ स्वच्छ केलेले परंतु पिण्यासाठी अशुद्ध पाणी औद्योगिक व व्यावसायिक वापरासाठी वापरता येईल. यासाठी एकच मोठे शुद्धीकरण संयंत्र बसवण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणातून काळाखणीमध्ये सांडपाणी पावसाचे पाणी येते अशा ठिकाणातून पाणी वळवणे आणि ड्रेनेज सिस्टीमला जोडणे आवश्यक आहे.सदर वेगवेगळ्या ठिकाणातून वळवलेले पाणी वेगवेगळ्या व छोट्या छोट्या पाणी शुद्धीकरण सयंत्रतन प्रक्रिया करून वितरित करता येणे शक्य आहे.सांडपाण्यासाठीची एस आय बी एम तसेच ऑरगॅनिक कचऱ्यासाठी गांडूळ खताच्या धर्तीवर टीव्ही प्रणाली वापरले असता या गोष्टी साध्य होतील.ठराविक कालावधी मध्ये काळ्याखणी मधील घनकचरा गोळा करणे त्याच्यावर योग्य प्रक्रिया करणे शक्य असल्यास पुनर्वापर करणे आवश्यक आहे.काळ्याखणीच्याआसपास असणारी जैवविविधता जपणे तिच्या संरक्षण करणेही आवश्यक आहे.जल प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने प्रदूषण नियंत्रक मंडळांबरोबर विचार विनिमय व कार्य करणे आवश्यक आहे.त्यासाठी विविध उपायांचे अवलंब करणे आवश्यक आहे.आणि हे सर्व अमलात आणत असताना सांगलीकरांच्या कष्टाचे कराच्या रुपानी दिलेल्या पैशाचा अपव्यय होणार नाही. त्यामध्ये अनिमितता राहणार नाही. बांधकाम व सुशोभीकरण याचा दर्जा चांगला राहील. यासाठी आपण तसेच सर्व प्रशासनाने सतर्क राहणे  व वेळोवेळी पाहणी करणे आवश्यक आहे.
      या सर्व विधायक कामाचा पुन्हा शुभारंभ करण्यासाठी आपण , सर्व परिसराची पाहणी करावी व पुढील कार्यवाहीस प्रारंभ करावा. अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे . 

कळावे                                      
आपला विश्वासू
मनोज भिसे
  ( अध्यक्ष,लोकहित मंच सांगली)

Share

Other News

ताज्या बातम्या