सांगली : जयहिंद सेनेला अखेर राज्य निवडणूक आयोगाने कायदेशीर मान्यता देऊन कायम नोंदणी क्र. SEC /UPP /JHS /2025/05 असा देण्यात आला आहॆ अशी माहिती पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी दिली आहे.
राज्यात अनेक वर्षे गुंठेवारी चळवळ उभा करून जनतेला न्याय देण्यासाठी अनेक कायदे, निर्णय घ्यायला भाग पाडले आहॆ. या चळवळीत गेल्या तीस वर्षाच्या प्रवासात अनेक मातब्बर नेते पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार,जनतेचा सहभाग लाभला आहॆ. त्या सर्वांचेच चंदनदादा चव्हाण यांनी आभार मानले. गुंठेवारी चळवळीच्या माध्यमातून केलेले समाजिक राजकीय कार्याचा आढावा उपयोगी ठरला आहॆ. राज्यातील या गुंठेवारी चळवळी च्या पदाधिकारी यांना जयहिंद सेनेत समाविष्ठ करून त्यांना राजकीय पटलावर संधी दिली जाणार आहॆ..
दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सांगली जिल्हाधिकारी मा. राजा दयनिधी यांनी ८३९ पानी प्रस्तावाला प्राथमिक मंजुरी देऊन राज्य निवडणूक आयोगाने कडे पाठवला.राज्यात अधिसूचना जाहीर केली होती. राज्यातून या नावाला कुणीही हरकत घेतली नाही. प्रशासन अधिकारी तसेच या नोंदणी साठी प्रथम पासून ऍड.अमीत शिंदे यांनी काम पाहिले. पूर्णतःवास नेल्या बद्दल या सर्वांचेच आभार मानतो..
राज्यातील सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणे, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्याला आर्थिक सक्षम करणे यासह इतरही प्रश्न घेऊन जनतेसाठी अखंड लढा सुरु ठेऊन सामान्य पदाधिकारी यांना निवडणूका लढवून महा पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत्या सह सहकार क्षेत्रात सर्व निवडणूकणा सामोरे जाणार आहोत. जास्तीत जास्त सदस्य पाठवण्याचा प्रयत्न राहणार आहॆ. अशी माहिती जयहिंद सेनेचे संस्थापक / पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी दिली आहॆ..
जयहिंद 🇮🇳🙏
नव्याने सर्व जिल्हा प्रमुख यांची नावे जाहीर केली जाणार आहेत.. लवकरच जयहिंद सेना या प्रादेशिक पक्षाचा मेळावा आयोजित केला जाईल.