धर्म चाहे जो भी हो, उपरवाला कर्म देखता है! , अत्यंत दुर्मिळ एबी निगेटिव " आयुष " च्या रक्तदात्यांनी पुण्याला जाऊन केले रक्तदान...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/03/2025 12:26 PM

"धर्म चाहे जो भी हो, एक अच्छा कर्म जरूर करे"
'क्योंकि ऊपरवाला कर्म देखता है! धर्म नही!' 

 श्री स्वप्निल पाटील व श्री सुशांत राडे यांचे एका भारतीय हवाई दलातील  जवानाला अत्यंत दुर्मिळ अशा एबी निगेटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती.

भारतीय हवाई दलातील जवानाला दुर्मिळअशा एबी निगेटिव्ह रक्ताची गरज होती. पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना दहा रक्त पिशव्यांची आवश्यकता होती. नातेवाईकांनी समाज माध्यमांवर आवाहन करून रक्तदात्यांना बोलावले, पण तरीही रक्ताची गरज भासत होती.
या बातमीची माहिती आयुष ब्लड हेल्पलाइन टीमला समाज माध्यमांवरून मिळाली. टीमने नातेवाईकांशी संपर्क साधून रक्तदाते पाठवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, आयुष ब्लड हेल्पलाइनचे स्वप्निल पाटील आणि सुशांत राडे यांनी तत्काळ आपल्या कामातून सुट्टी घेऊन पुणे येथे जाऊन रक्तदान केले.
त्यांच्या या कार्याबद्दल आयुष सेवाभावी संस्थेतर्फे दोघांचेही हार्दिक अभिनंदन!

Share

Other News

ताज्या बातम्या