कोल्हापूर-सोलापूर- कलबुर्गी एक्सप्रेसला सांगली थांबा देणे शक्य : सतिश साखळकर, नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/03/2025 3:32 PM

*कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला सांगली थांबा देणे शक्य. संभावित वेळापत्रक प्रसिद्ध....तोट्या चालणारी कलबुर्गी-कोल्हापूर गाडी सांगली थांबा मिळाल्यानंतर फायद्यात येईल.*
*सतीश साखळकर*

सांगली जिल्हातून रस्ते मार्गाने सोलापूर जाणे अतिशय महाग आहे. सांगली रेल्वे स्टेशन ते सोलापूर विद्युत रेल्वे मार्ग 4 वर्ष आधीच पूर्ण झाला व सांगली स्टेशनवर 5 प्लॅटफाॅर्म असताना देखील सांगली स्टेशनवरून सोलापूर जाणारी एकही रेल्वे गाडी मध्य रेल्वे सुरू करत नाही.  त्यामुळे प्रवाशांना भूर्दंड सोसावा लागतो.

सांगली जिल्हा नागरिक जाग्रृती मंचने या प्रश्नाचा उपाय शोधून काढलाय.

सध्या चालणार्या कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस व कलबुर्गी-सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना कोल्हापूर ते कलबुर्गी दरम्यान कुठलाही थांबा रद्द न करता सांगलीला थांबा मिळू शकतो.

सांगलीचा अतिरिक्त थांबा मिळाल्यामुळे तोट्यात चालणारी कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस फायद्यात येईल. 

ही एक्सप्रेस सांगलीचा थांबा मिळाल्यामुळे फायद्यात आल्यास आणखी एक कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस गाडी मिळू शकेल.

सांगली जिल्हा नागरीक जाग्रृती मंचने कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेसचा संभावित सांगली थांब्या सहीत वेळापत्रक प्रसिद्ध केला असून मध्य रेल्वेला ही गाडी सांगलीत थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे अशी माहीती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी दिली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या