आयुक्त सत्यम गांधी यांचे विध्यानगर वारणाली च्या नागरिकांनी मानले आभार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/04/2025 1:39 PM

विद्यानगर वारणाली येथे अंदाजे 20 ते 25 वर्षापासून रस्त्यावरती जनावराचा गोठा व घराचे अतिक्रमण करण्यात आले होते ते अतिक्रमण महापालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात पाडले होते परंतु राडा रोडा बांधकाम कडे प्रलंबित होता. आम्ही त्याची तक्रार नागरिक तक्रार या व्हाट्सअप नंबर वरती  केल्यानंतर त्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली व आज अखेर तो राडा रोडा महापालिका प्रशासनाकडून उचलण्यात आला व रस्ता नागरिकांसाठी खुला झाला. 
नूतन आयुक्त  माननीय सत्यम गांधी साहेब यांनी नागरिक तक्रार निवारण व्हाट्सअप नंबर सुरू करून थेट नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल समस्त सांगलीकर जनतेच्या वतीने माननीय आयुक्त सत्यम गांधी साहेबांचे मनःपूर्वक आभार !!


मा सुनिल भोसले,
नागरिक, वारणाली सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या