📍 प्रभाग क्रमांक १५ - रमा माता नगर, धनंजय प्राथमिक शाळेसमोर, सांगली
सांगली महापालिकेचे आयुक्त यांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी "येथे कचरा टाकू नये" असा मोठा फलक लावण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाचे पालन व्हावे, परिसर स्वच्छ राहावा, हाच हेतू होता. मात्र दुर्दैवाने त्या फलकाचा नागरिकांकडून बोजवावा (उपहास/अपमान) झाला!
🤦♂️ प्रशासनाचे आदेश धाब्यावर?
😴 आरोग्य विभाग झोपेत?
♻️ फक्त फलक लावून कर्तव्य पूर्ण होत नाही... अंमलबजावणी आणि देखरेख हवीच!
❗प्रश्न उपस्थित होतो :
फलक असूनही कचरा का टाकला जातो?
जबाबदार विभागाने कारवाई का केली नाही?
फक्त जाहिराती पुरेशा आहेत का?
नागरिकांचं आरोग्य, परिसराची स्वच्छता आणि शाळेतील मुलांचं वातावरण याकडे दुर्लक्ष होत आहे हे लक्षणीय आहे.
🛑 मागणी :
1. तात्काळ सीसीटीव्ही बसवावा.
2. कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
3. परिसर नियमितपणे साफ ठेवावा.
4. जनजागृती मोहीम राबवावी.
👉 स्वच्छ सांगली ही केवळ जबाबदारी नव्हे, तर सन्मान आहे!
#स्वच्छसांगली #प्रभाग१५ #सांगलीमहापालिका #आरोग्यविभाग #सामाजिकजागृती #नागरिककर्तव्य
*मनोज भिसे*
*अध्यक्ष लोकहीत मंच सांगली*