बुधवार दि १८ रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/06/2025 4:49 PM

इस्लामपूर दि.१६ प्रतिनिधी
     राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बुधवार दि.१८ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता सांगली येथील विष्णूदास भावे नाट्य मंदीरात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे मेळाव्याचे अध्यक्ष असून माजी मंत्री,जेष्ठ नेते प्रा.लक्ष्मणराव ढोबळे हे मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदेव गायकवाड,प्रदेशाध्यक्ष पंडीत कांबळे यांची या मेळाव्यास विशेष उपस्थिती लाभली आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुमार लोंढे व शहर जिल्हाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले. 
    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, नगराध्यक्ष मुकुंद कांबळे,माजी सभापती शैलेंद्र सुर्यवंशी, सामाजिक न्याय विभागाचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय लोंढे,संजय खवळे प्रमुख्याने उपस्थित होते.
      श्री.लोंढे व श्री.कांबळे म्हणाले,या मेळाव्यास आ.अरुणअण्णा लाड, आ.रोहित पाटील,माजी आ.मानसिंगभाऊ नाईक,माजी आ.सुमनताई पाटील,श्रीमती अनिता सगरे,मिरज तालुक्याचे नेते मनोज बाबा शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सध्या च्या मुंबई आणि दिल्लीच्या सरकारांना मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांची फिकीर नाही. मागासवर्गीय समाजाच्या समोर अनेक प्रश्न वा वासून उभा आहेत. आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाला संघटीत करून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
      वाळव्याचे अरुण कांबळे,मुकुंद कांबळे, शैलेंद्र सुर्यवंशी,विजय लोंढे,संजय खवळे, सुभाष माने,मिरजेचे बाळासाहेब होनमोरे, प्रमोद इनामदार (कळंबी),भिमराव बेंगलोरे, कुपवाडचे नगरसेवक शेडजी मोहिते, नंदकुमार घाडगे,सांगलीचे गॅब्रिअल तिवडे, कुमार वायदंडे,भारत चौगुले,अभिजित रांजणे,आदर्श कांबळे,संतोष कांबळे,सचिन कांबळे (माधवनगर),शिराळ्याचे प्रकाश कांबळे,जंबु पांढरबळे (चिकूर्डे),कुंडलचे सरपंच जयराज व्होवाळ,आटपाडीचे विनोद बनसोडे,बाबासो वाघमारे (खरशिंग) यांच्या सह जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या