" आयुष " च्या वतीने सालाबादप्रमाणे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/06/2025 9:57 PM

आपण कुठे जन्माला याव हे आपल्या हातात नाही पण माणूस म्हणून जन्म मिळाल्यावर काय, कस कराव हे मात्र नक्कीच आपल्या हातात. आपले हात कायम योग्य मदतीसाठी पुढे यावेत. माझ्या या शुद्व हेतु साठी अनेक मित्र, सुहृयी परिजन यांचा कायम च पाठिंबा राहिला. आपण करत असलेल्या मोठ्या कार्याचा कोणताही बड़ेजाव न करता साधेपणाने आमच्या त सामील होणाऱ्या सर्वाना आयुष कडून धन्यवाद. 
आर.पी.पाटील माध्यमिक शाळेत परिसरातील अनेक गरजू मुले शिक्षण घेतात. त्याना वर्षभरासाठी लागणाऱ्या वह्या आयुष कडून कायम दिल्या जातात. शाळेच्या पहिल्या  दिवशी एक छोटी मदत करून आम्ही पालकांचा भार कमी करायचा प्रयत्न करतो.
        यावेळी आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, कॉलिटी पावर चे उद्योजिका सौ.निवेता भरणीधरण, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ.तन्वी शिंदे, डॉ.तन्मय मेहता, डॉ. रोहन पाटील, डॉ. पृथ्वीराज पाटील, यशवंत संस्थेचे चेअरमन राजगोंडा पाटील, संचालिका वेणुताई पाटील, मुख्याध्यापिका संध्या चव्हाण, सौ.संपदा पाटील, आयुष्य संस्थेचे उपाध्यक्ष महावीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या