प्रति
मा. आयुक्त
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
विषय: - सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग जाहीर प्रकटन क्रमांक 8 2025/ 2026
मधील मजूर सोसायटीची कामे रद्द करण्याबाबत
महोदय
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय बेकायदेशीर रित्या शासन परिपत्रक व शासन जीआर डावलून चुकीच्या पद्धतीने जाहीर प्रकरण क्रमांक 8 2025/2026
मध्ये मुरूम पुरवठा व वार्षिक दर करार पद्धतीने कामे काढले आहेत सदर कामे कशी बेकायदेशीर आहेत याबाबत आपणास व आपल्या महापालिकेतील निविदा समिती शासन निर्णय शासन परिपत्रक सादर करून तक्रार करण्यात आली होती मात्र तरीसुद्धा त्याची दखल न घेता सदर कामे मंजूर करण्याचा घाट घालण्यात आला आहे
रेटून बेकायदेशीर रित्या काम करण्याच्या या प्रवृत्ती विरोधात सदर कामे रद्द न केल्याच्या निषेधार्थ आज धरणे आंदोलन करण्यात आले.
तरी तात्काळ सदर कामे रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा