सांगली पेठ रस्त्यावर अपघातांची मालिका, जबाबदार कोण?

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/07/2025 11:32 AM

सांगली पेठ रस्ता ची जुनी अवस्था भयानक होते वारंवार रस्ता खराब होत होता खड्डे पडत होते त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होत होते राज्यातील देशातील इतर रस्ते राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जात होते रस्ते सुस्थितीत होत होते मात्र आपल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला राष्ट्रीय महामार्ग जोडला जात नव्हता त्यावेळेस सर्व पक्ष कृती समितीच्या व  नागरिक जागृती मंच माध्यमातून आम्ही आंदोलने करून पाठपुरावा करून सदर रस्ता करून घेतला.
मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या कोणत्याही मानांकनात अथवा नियमात सदर रस्ता बसत नाही त्यामुळे सदर रस्ता मंजूर होऊन काम व्हायला वेळ लागला 
इतर ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते बघितले तर ते सहा पदरी आहेत तसेच प्रत्येक छोट्या मोठ्या गावात उड्डाणपूल आहेत मोठ्या शहरांना बायपास आहेत मात्र या रस्त्याबाबत सगळे नियम पायदळी तुडवलेले आहेत त्याचाच हा परिणाम आहे.
मग याला जबाबदार कोण..?
प्रत्येक जण चांगले झाले की श्रेय घ्यायला असतात..? मात्र सध्याच्या अपघाताच्या मालिका घडत आहेत त्याचे श्रेय कोण घेणार आहे..? 
सहा पदरी रस्त्याला विरोध कोणी व का केला असे बरेचसे प्रश्न उच्चारले जात नाहीत किंवा त्याच्यावर लिहिले जात नाही बोलले जात नाही ही खरी वस्तुस्थिती आहे 
काही ठिकाणी स्पीड बेकर पांढरे पट्टे हे तकलादु उपाय काही उपयोगाचे नाहीत त्याला छोट्या मोठ्या गावात उड्डाणपूल बायपास हाच पर्याय आहे याबाबत सुद्धा उहापोह व्हावा हीच विनंती आहे.

सतीश साखळकर.
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 
सर्वपक्षीय कृती समिती सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या