मिरज कलबुर्गी आषाढी स्पेशल कायम करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांची भेट घेणार :: आ. बसवराज मतीमुड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/07/2025 8:58 PM

        रेल्वे प्रशासनाकडून आषाढी एकादशी निमित्त सुरू केलेली गाडी क्र.01107/08 मिरज कलबुर्गी आषाढी स्पेशल हि एक्सप्रेस गाडी कायमस्वरूपी सुरू राहावी. ही गाडी 01 जुलै ते 10 जुलै या कालावधीत धावली असता या गाडीस प्रवाशांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.या गाडीची वेळ सोईची व उपयुक्त अशी असल्याने विद्यार्थी,मजुर,कामगार,व मिरज येथे वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्यांसाठी फायद्याची आहे व सकाळच्या  सत्रामध्ये मिरज सोलापुर व कलबुर्गी या मार्गावर गाडी नसल्यामुळे ही गाडी  नियमित करावी अशी मागणी कोल्हापूर सांगली सोलापूर व कलबुर्गी जिल्ह्यातील प्रवासी संघटनांनी रेल्वे विभागाकडे केलेली आहे.
          याच पार्श्वभूमीवर आज कलबुर्गी रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य यांनी कलबुर्गी चे आमदार बसवराज मतिमूड यांची भेट घेऊन या गाडी संदर्भात सविस्तर चर्चा केली व या आशयाचे निवेदन देण्यात आले.
           या वेळी कलबुर्गीचे आमदार बसवराज मतीमुड यांनी मिरज कलबुर्गी मिरज आषाढी स्पेशल ही गाडी कायमस्वरूपी सोडण्याकरिता रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमणा यांची भेट घेऊन ही गाडी कायमस्वरूपी सोडण्यासाठी प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले.
        यावेळ मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत कलबुर्गी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तुळजाराम भोरे, के. सी. पाटील, रवी भोरे, लक्ष्मण भोरे, सोपान भोरावत, आदित्य उगाडे, नागराज भोरे,अक्षय वाकोडे,श्याम वाकोडे व निलेश भोरे आदी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या