राजू शेट्टी यांनी मांडला शक्तीपिठ महामार्गाचा ग्राऊंड रिपोर्ट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/07/2025 12:26 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शक्तीपीठ महामार्गाच्या संदिग्ध भुमिकेमुळे याचे दुरगामी परिणाम जिल्ह्यातील शेतकरी नागरीक व शहरी भागातील लोकांना भोगावे लागणार आहेत. 
       सध्या रत्नागिरी - नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना समांतर नागपूर -गोवा महामार्ग कशासाठी हा प्रश्न सरकारला  निरूत्तर करणारा आहे.  सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग आल्यानंतर हा महामार्ग भौगोलिक दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी मारक ठरणार आहे.

         १) शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती गंभीर होणार आहे. 
        २) कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा , वारणा , पंचगंगा , भोगावती , कासारी , दुधगंगा , वेदगंगा या सात नद्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने महापूर काळात पाणी नदीपात्राबाहेर महिना ते दिड महिना राहिल्याने क्षारपड जमीनीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 
         ३) जिल्ह्यातील साखर उद्योगावर याचा परिणाम होवून १५ ते २० टक्के ऊस  उत्पादनात घट होणार आहे. यामुळे साखर कारखानदारीसमोर मोठे संकट निर्माण होणार आहे. 
          ४) शक्तीपीठ महामार्गातील भराव व पुलामुळे कोल्हापूर शहरात १० ते १५ फुटांनी पाणीपातळी वाढणार असून यामुळे नागरीकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. 
      ५) कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या पश्चिमेकडून पुर्वेकडे  वाहत असताना सह्याद्री घाटमाथ्यावरून येणा-या पाण्याचा प्रवाह वेगाने येत असल्याने पाण्यास अडथळे निर्माण झाल्यास पाणी मोठ्या प्रमाणावर पसरणार असून गाळ व माती नदीपात्रात साठून नदीची पाणी धारण क्षमता कमी होणार आहे. 
       ६) सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून गोव्याला जाण्यासाठी ७ रस्ते यापैकी ४ राष्ट्रीय महामार्ग व ३ राज्य महामार्ग असताना ८ वा रस्ता कशासाठी यामुळे पर्यावरणाची सर्वाधिक हाणी होणार असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व इकोसेन्सिटीव्ह झोन मधून हा रस्ता जाणार आहे. 
          ७)आंबोलीपासून ते महाबळेश्वर पर्यंत पडणारे पावसाचे पाणी शिरोळ तालुक्यात एकत्रित होते. पावसाळ्यात दररोज जवळपास ५ ते ६ लाख क्युसेक पाणी राजापूर बंधा-यातून प्रवाहित होते या सर्व पाण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. 
     ८) हिप्पर्गी धरणाच्या कृष्णा नदीच्या बॅक वॅाटर मुळे पंचगंगा , वारणा , दूधगंगा, या नद्याचे पाणी कृष्णा नदीच्या प्रवाहात सामावून न घेतल्याने वरील नद्यांच्या शहरातील व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पसरते. 
  ९) सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 50 हजार एकर क्षारपड जमीन आहे. पुढील दहा वर्षात जवळपास एक लाख एकरा पर्यंत क्षारपडचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या