सांगली दि. १२,
राज्य सरकारने खाजगी मदतनीस तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयात ठेवू नये हा दि १९ डिसेंबर २०२४ चे परिपत्रक रद्द करावे अन्यथा याची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात करावी अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा जय हिंद सेने कडून राज्याचे अपर मुख्य सचिव मा.विकास खरगे ( महसूल ) यांना निवेदन देताना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी दिला आहॆ.
१० सप्टेंबर २०२५ रोजी प्रत्येक कर्मचारी यांना ओळखपत्रे कंपलसरी असावेत असे पत्रक सरकारने जारी केले आहॆ. राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून मानधनावर सुशिक्षित बेकार मुलांना भरती करून त्यांना एक महिन्याचे ट्रेनिंग द्यायचे आहॆ.ज्या अधिकाऱ्यांना कर्मचारी कमी पडतात त्यांनी एप्लायमेन्ट मार्फत ग्रॅजयूट मुलांची भरती करावी. त्यांना रितसर ओळखपत्र देणेत यावी अशीही मागणी करण्यात आली आहॆ.
मात्र जनतेची लूट करणाऱ्या खाजगी नोकर यांना कामावर ठेवू या सरकारी परिपत्रक काढण्याचा सरकारचा खरा हेतू असा आहॆ, समाजात महसूल विभागाने पारदर्शी कारभार करावा, आम जनते मध्ये सरकारची विश्वासहर्ता निर्माण व्हावी हा हेतू असताना अधिकारी या परिपत्रकाचे उल्लंघन करताना सिद्ध झाले आहॆ. अशा अधिकाऱ्यावर तात्काळ शिस्त भंगाची कारवाई झाली पाहिजे. सरकारला कारवाई करायची नसेल तर अशी परिपत्रके सरकारने काढू नयेत. ती रद्द करावीत अशी मागणी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचे कडे करणायत आली आहॆ. त्यांनी या बाबत गांभीर्याने कारवाई करावी असे आदेश मा जिल्हाधिकारी काकडे यांना देणेत आले आहेत.
या शिष्ठमंडळात पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण, संपर्क प्रमुख महेशजी मासाळ,उपजिल्हा प्रमुख शांतीनाथ चौगुले,मिरज शहर प्रमुख हुसेन शेख,कुपवाड शहर युवा प्रमुख मारुती घुटूगडे,पत्रकार अर्जुन हजारे, अक्षय पवार आदी उपस्थित होते.