*दारणा नदी किनारी घाट बांधण्याबाबत मनसेची मागणी*
भृगुऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर या ऐतिहासिक व पावन भूमीवर दारणा नदीकिनारी घाटाची अत्यंत आवश्यकता आहे. सध्या त्या परिसरात घाट व सोयीसुविधा नसल्यामुळे स्थानिक नागरिक तसेच परिसरातील गावांतील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
म्हणूनच दारणा नदीकिनारी सुंदर, सुसज्ज व आधुनिक घाटाची उभारणी करून नदी परिसराची स्वच्छता करावी. तसेच स्मशानभूमी ते दशक्रिया विधी घाटापर्यंत रस्ता बांधून संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बांधकाम काम अभियंता श्री. सिद्धेश मुळे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
आपण ही मागणी तातडीने विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती, अशी विनंती या वेळी मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण, उपशहर अध्यक्ष श्याम देशमुख, कैलास भोर, अक्षय देशमुख, मनोज ठाकूर,गणेश पठाडे, राजेश गायकवाड, संदेश देशमुख, संतोष सोनवणे, वैभव गायकवाड, सौरभ जाधव यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते