आरटी आय न्यूज नेटवर्क
विजय जगदाळे
मसवड :माण तालुक्यातील पुळकोटी येथील खुनाच्या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, ठसे तज्ञ आणि स्वान पथक तात्काळ घटनास्थळी दाखल
तर बेस्ट डिटेक्टर दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली
माण तालुक्यातील पुळकोटी गावात एका वृद्ध महिलेला अज्ञात इसमाने निर्घृणपणे ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. सुलभा मारुती गलंडे (वय 65, रा. पुळकोटी, ता. माण या महिला दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.00 या वेळेत त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने कपाळावर, गळ्यावर तसेच चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केला आहे. इतकेच नव्हे तर खूनानंतर घटनास्थळी पडलेले रक्त पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुलगा संदेश मारुती गलंडे (वय 45, व्यवसाय डॉक्टर, रा. वडुज, मूळ रा. पुळकोटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 299/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रंजित सावंत यांनी रात्री उशिरा घटनास्थळाची पाहणी केली. तसेच सपोनि दराडे (सो. दहिवडी पोलीस ठाणे) यांनीही भेट देऊन तपासाची माहिती घेतली. सध्या हा तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे यांच्याकडे असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे.