कोरो इंडिया व स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/12/2025 5:48 PM

नांदेड :- आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने कोरो इंडिया व सलग्नित संस्था वंचित विकास लोकसंस्था नांदेड, रयत सेवाभावी संस्था सुजलेगाव, जनक विकास मंडळ बाराळी भारतीय भटक्या विमुक्त जाती नांदेड या संस्थेच्या द्वारे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन व डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम घेण्यात आला.

आज दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी सिडको, नांदेड येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन व डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.

जागतिक मानवी अधिकार व त्यांचे संविधानिक हक्क याबाबत डॉ. अनंत राऊत यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस केव्हापासून साजरा केला जातो त्याची उपयुक्तता काय आणि सध्याच्या काळात भारतीय संविधानिक मूल्य जोपासण्यासाठी त्याची कलम ४२ व्या कलमाव्दारे १९९३ रोजी मानवी हाक संरक्षण कायदा पारित करण्यात आला. मानवाचे हक्क व अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत असे प्रतिपादन डॉक्टर राऊत यांनी केले.
याच कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या जिल्हाध्यक्ष डॉ. यास्मिन शेख आणि यांनी महिला वर होणाऱ्या  अत्याचार व लैंगिक शोषण याबाबतीत कायदेविषयक मार्गदर्शन केले व महिलांनी समाजामध्ये लीडरपणे उभं राहावं व संविधानाचे रक्षण करावे असं त्यांनी आजच्या या दिनाच्या निमित्ताने प्रतिपादन केलेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणा गीताने माधव पवार यांनी केली.
त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्यशोधक हमाल मापाडी संघटनेचे संस्थापक ,एक गाव एक पानवटा या संकल्पनेचे जनक डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे प्रस्तावना ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी मांडली.
 या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनंत राऊत व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हाध्यक्ष डॉ. यास्मिन शेख पठाण, ॲड सचिन मगर, प्रमुख पाहुणे दत्ता तुमवाड, शकीला शेख व वंचित विकास लोकसंस्थेचे समता फेलो ज्ञानोबा सूर्यवंशी,अनुराधा शिंदे आम्रपाली सोनुले,
 रयत सेवाभावी संस्थेचे फेलो सपना टोमके,अध्यक्ष इरवंत सुर्यकार व समता ग्रुप 
जन विकास मंडळ चे आनंदा बनकर, मास्टर माधव पवार ,जाकीर हुसेन,भारतीय विमुक्त जाती संघटना नांदेडचे देविदास हादवे,गजानन मुंजाजी साखरे,यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला
त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये ॲड सचिन मगर, जन विकास मंडळाचे अध्यक्ष कमलाकर एच. पी  , व्हि. आर. असोरे, कॉम्रेड डि. एन. घायाळे, दत्ता जोगदंड, डी एन. मोरे खैरकेकर, विशाखा वाटोरे ताई ,भरारी महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष शिला जाधव, सुरेखा माने, आदि जनांची उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरवंत सुर्यकार, 
तर आभार  आनंदा बनकर यांनी मांडले
शासकिय विविध लाभापासून वंचित असलेल्या महिला, बचत गटाच्या सदस्या, एकल महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या