आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या मार्फत राष्ट्रीय युवा दिन, बालविवाह मुक्त भारत अभियान, व्यसनमुक्ती, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दि. १२ जानेवारी २०२५ रोजी इस्माईल साहेब मुल्ला, लॉ कॉलेज, सातारा येथे करण्यात आले होते.. इस्माईल साहेब मुल्ला कॉलेजच्या प्राचार्या वैशाली जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, आय जी महादेव कोळी, सातारा यांनी राष्ट्रीय युवा दिन, बालविवाह मुक्त भारत अभियान, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे आणि नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. किशोर काळोखे, सामाजिक कार्यकर्ते, व्यसनमुक्ती केंद्र सातारा समन्वयक यांनी व्यसनमुक्ती आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी युवकांचे स्थान या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रमुख व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सतारा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा निकुंभे सर यांनी केले.